वन-डेमधील 'पॉवर प्ले' होणार बंद
By admin | Published: June 27, 2015 01:17 PM2015-06-27T13:17:05+5:302015-06-27T13:20:36+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही नवीन बदलांना मान्यता दिली असून त्यानुसार यापुढे वन-डे सामन्यात फलंदाजी करणा-या संघाला 'पॉवर प्ले' मिळणार नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एकदिवसीय क्रिकेट सामन्यांतील नियम बदल केला असल्याने या नव्या बदलांमुळे गोलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या नव्या नियमांनुसार क्रिकेटच्या मैदानातून 'पॉवर प्ले' हा प्रकार रद्द करण्यात आला असून शेवटच्या दहा षटकांत ३० यार्डाच्या सकर्लबाहेर पाच खेळाडू ठेवण्याचीही परवानगी मिळाली आहे.
बार्बाडोस येथे एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकदिवसीय क्रिकेटमधील महत्वपूर्ण बदलांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे नवीन नियम येत्या ५ जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आम्ही नवीन शिफारसी मागवल्या होत्या, त्यानुसार आलेल्या शिफारसींची दखल घेत नवीन बदल करण्यात आले असून त्याचा फायदा गोलंदाजांना मिळू शकेल.
आयसीसीने केलेले नवे बदल ?
- फलंदाजी करणा-या संघाला 'पॉवर प्ले' मिळणार नाही
- फलंदाजाला आता कोणत्याही नो-बॉलवर फ्री हिटची संधी मिळेल.
- पहिल्या १० षटकांत कॅचिंग पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य नाही
- शेवटच्या १० षटकांत ३० यार्डांच्या वर्तुळाबाहेर आता चारऐवजी पाच खेळाडू ठेवण्यास परवानगी