दुखापतीवर मात करत हिमा दासची 'सुवर्ण'धाव; दोन सुवर्णपदकांना गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 11:41 AM2019-07-09T11:41:45+5:302019-07-09T11:42:08+5:30

भारताची स्टार धावपटू हिमा दासनं कुटनो अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठवडाभरात दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

Poznan Athletics Grand Prix: Hima Das wins second international gold in 200m race | दुखापतीवर मात करत हिमा दासची 'सुवर्ण'धाव; दोन सुवर्णपदकांना गवसणी

दुखापतीवर मात करत हिमा दासची 'सुवर्ण'धाव; दोन सुवर्णपदकांना गवसणी

Next

पोलंड : भारताची स्टार धावपटू हिमा दासनं कुटनो अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठवडाभरात दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमानं 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. व्ही के विस्मयाने ( 24.06 सेकंद) रौप्यपदक जिंकले. राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या मुहम्मद अनासनेही पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 21.18 सेंकदाच्या वेळेसह बाजी मारली.  

आसामच्या या धावपटूनं मंगळवारी पोझनान स्पर्धेत 200 मीटर शर्यतीतच बाजी मारली होती. तिथे तिनं 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. विस्मयाला ( 23.75) येथे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. जागतिक कनिष्ठ गटातील विजेती आणि 400 मीटर शर्यतीतील राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या हिमानं पोलंड येथील स्पर्धेत वर्चस्व गाजवले. 
 











भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान
नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणाऱ्या हिमा दास यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सने भारताची '30 अंडर 30' अशी एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये स्मृती आणि हिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.    
'30 अंडर 30' म्हणजे नेमके काय
फोर्ब्सने या यादीमध्ये प्रत्येक देशातील 30 वर्षांखालील युवकांचा सन्मान केला जातो. 30 वर्षांखालील ज्या व्यक्तींनी देदिप्यमान कामगिरी केली आहे, त्यांना या यादीमध्ये प्रवेश दिला जातो.

Web Title: Poznan Athletics Grand Prix: Hima Das wins second international gold in 200m race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.