सराव सामना : भारताकडून विंडीज ४५ धावांनी पराभूत

By admin | Published: March 11, 2016 03:46 AM2016-03-11T03:46:59+5:302016-03-11T03:46:59+5:30

रोहित शर्माने नाबाद ९८ धावांची आक्रमक खेळी आणि नंतर मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्याने घेतलेल्या विकेटच्या जोरावर भारताने सराव सामन्यात वेस्ट इंडीजचा ४५ धावांनी पराभव केला.

Practice match: India lose by 45 runs | सराव सामना : भारताकडून विंडीज ४५ धावांनी पराभूत

सराव सामना : भारताकडून विंडीज ४५ धावांनी पराभूत

Next

कोलकाता : फॉर्मात असलेल्या रोहित शर्माने नाबाद ९८ धावांची आक्रमक खेळी आणि नंतर मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्याने घेतलेल्या प्रत्येकी दोन विकेटच्या जोरावर भारताने सराव सामन्यात वेस्ट इंडीजचा ४५ धावांनी पराभव केला.
ईडन गार्डनच्या मैदानावर झालेल्या या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारली. विंडीजला दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाला उत्तर देताना त्यांचा डाव १९.२ षटकांत १४० धावांत संपुष्टात आला. त्यांच्या जॉनसन चार्ल्सने १८, ख्रिस गेलने २०, मर्लोन सॅम्युअल्सने १७, डे्वेन ब्रावोने १३, आंद्रे रसेलने १९ धावा केल्या. त्यांचा जैसन होल्डर १३ धावा काढून नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद शमीने ३० धावांत २, पवन नेगीने १५ धावांत २, रवींद्र जडेजाने २६ धावांत २ व हार्दिक पंड्याने २५ धावांत दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, भारताने ६ बाद १८५ धावा केल्या. सलामीला फलंदाजीस येऊन रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत ५७ चेंडूत ९ चौकार व ७ षटकार ठोकून ९८ धावा करून नाबाद राहिला. त्याच्याबरोबर शिखर धवनने १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार मारून २१ धावा केल्या. नंतर युवराजसिंगने २० चेंडूत ३ चौकार व १ षटकारासह ३१ धावा केल्या. रोहित व युवराजने तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडीजकडून टेलर व बेनने प्रत्येकी दोन बळी घेतले. (वृत्तसंस्था) संक्षिप्त धावफलक :
भारत : ६ बाद १८५ (रोहित शर्मा नाबाद ९८, शिखर धवन २१, युवराजसिंग ३१, रवींद्र जडेजा १०, टेलर २/२६, बेन २/३०); वेस्ट इंडीज : १९.२ षटकांत सर्वबाद १४० (जॉनसन चार्ल्स १८, ख्रिस गेल २०, मर्लोन सॅम्युअल्स १७, डे्वेन ब्राव्हो १३, आंद्रे रसेल १९, जैसन होल्डर नाबाद १३, हरभजन १/१२, शमी २/३०, बुमराह १/६, नेगी २/१५, जडेजा २/२६, पंड्या २/२५)

Web Title: Practice match: India lose by 45 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.