विराटकडून ‘रिव्हर्स स्वीप’चा सराव

By admin | Published: January 14, 2017 01:20 AM2017-01-14T01:20:30+5:302017-01-14T01:20:30+5:30

दुपारच्या सत्रात भारतीय संघाने फलंदाजीचा सराव केला. प्रथम कर्णधार विराट, मनीष पांडे, के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी फलंदाजी केली.

Practice of 'Reverse sweep' by Virat | विराटकडून ‘रिव्हर्स स्वीप’चा सराव

विराटकडून ‘रिव्हर्स स्वीप’चा सराव

Next

दुपारच्या सत्रात भारतीय संघाने फलंदाजीचा सराव केला. प्रथम कर्णधार विराट, मनीष पांडे, के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी फलंदाजी केली. यापैकी लक्ष वेधून घेतले ते कोहलीने. प्रथम डिफेन्सिव्ह फलंदाजी करणाऱ्या विराटने नंतर अनेकदा चेंडू प्रेक्षक गॅलरीत भिरकावले. त्यानंतर या भारतीय कर्णधाराने रवीचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, युवराजसिंग आणि दस्तुरखुद्द प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या फिरकी गोलंदाजीवर दीर्घकाळ ‘रिव्हर्स स्वीप’च्या फटक्यांचा सराव केला. दरम्यान, इंग्लंडचा संघ शुक्रवारी सकाळी पुण्यात दाखल झाला. त्यांनी संध्याकाळच्या सत्रात सराव केला.
मी कर्णधार असताना संघात आल्यापासून विराटने वेगाने स्वत:ला विकसित केले आहे. खेळाडू म्हणून त्याची मॅच्युरिटी, खेळाप्रती कमिटमेंट संघाला पुढे नेणार, याबाबत माझ्या मनात शंका नाही. तो कायम स्वत:च्या खेळात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आमच्यात चांगला संवाद आहे. तो खेळाबद्दल नेहमी सकारात्मक विचार करीत असतो. मी नेहमी त्याच्यासोबत असेल. कर्णधाराला सल्ला देणे, हे यष्टिरक्षकाचे काम असते. आता माझे काम त्याला गरज भासेल, तेथे सल्ला देणे हे आहे. ते मी करणार आहे. - महेंद्रसिंग धोनी

Web Title: Practice of 'Reverse sweep' by Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.