प्रज्ञानला पुनरागमनाचे वेध

By admin | Published: September 12, 2015 03:21 AM2015-09-12T03:21:44+5:302015-09-12T03:21:44+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निरोप देणाऱ्या कसोटीत खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून डच्चू मिळालेला डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा

Pragyan's coming back | प्रज्ञानला पुनरागमनाचे वेध

प्रज्ञानला पुनरागमनाचे वेध

Next

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निरोप देणाऱ्या कसोटीत खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून डच्चू मिळालेला डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याला द. आफ्रिकेविरुद्ध सुरू होत असलेल्या गांधी - मंडेला कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारताच्या संभाव्य ३० खेळाडूंमध्ये स्थान मिळाले. या फिरकीपटूची नजर टीम इंडियात पुनरागमन करण्याकडे असेल. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार सिनियर क्रिकेट निवड समितीने द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी संभाव्य ३० खेळाडू निवडले. या खेळाडूंचे शिबिर २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत बेंगळुरु येथे सुरू होत आहे. संभाव्य खेळाडूंमध्ये प्रज्ञानचे नाव लक्षवेधी आहे कारण तो नोव्हेंबर २०१३ मध्ये सचिनला निरोप देणाऱ्या सामन्यात खेळला होता. त्याने दहा गडी बाद करीत सामनावीराचा पुरस्कार पटकविला होता. त्यानंतर गतवर्षी त्याची गोलंदाजी शैली संशयास्पद ठरविण्यात आली. या धक्क्यातून सावरल्यानंतर संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान मिळणे ही प्रज्ञानसाठी मोठी बाब ठरते. संभाव्य खेळाडूंमध्ये अन्य दोन डावखुरे गोलंदाज रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचे देखील नाव आहे. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पटेलबद्दल बोलताना त्याच्यात कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता नसल्याचे विधान केले होते. पटेलने मात्र द. आफ्रिकेच्या अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटीत चेंडू आणि बॅटने उल्लेखनीय कामगिरी बजावली. लंकेविरुद्ध अखेरच्या कसोटीत अंतिम एकादश बाहेर राहिलेला अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग हा देखील संभाव्य खेळाडूंमध्ये आहे. जखमी होऊन संघाबाहेर झालेला वेगवान मोहम्मद शमी याला देखील या यादीत स्थान देण्यात आले. याशिवाय वेगवान उमेश यादव, मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी, लेग स्पिनर कर्ण शर्मा, युवा फलंदाज केदार जाधव व मनीष पांडे यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. भारताने लंकेला त्यांच्याच भूमिक २-१ ने पराभूत करीत २२ वर्षानंतर कसोटी मालिका जिंकली. द. आफ्रिकेचा भारत दौरा २ आॅक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीत होणार
असून चार कसोटी, पाच वन डे
आणि तीन टी-२० सामन्यांचे आयोजन होणार आहे. (वृत्तसंस्था)

संभाव्य खेळाडू :
महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, रिद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, हरभजनसिंग, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन, करुण नायर, सुरेश रैना, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, प्रज्ञान ओझा, रवींद्र जडेजा, मोहित शर्मा, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, धवल कुलकर्णी, केदार जाधव आणि मनीष पांडे.

Web Title: Pragyan's coming back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.