नेमबाजांविषयी भाकीत कठीण
By admin | Published: July 30, 2016 05:21 AM2016-07-30T05:21:10+5:302016-07-30T05:21:10+5:30
लंडन आॅलिम्पिकनंतर खेळातील नियम पुर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीविषयी भाकीत करणे अत्यंत कठीण ठरेल, असे भारताची माजी
मुंबई : लंडन आॅलिम्पिकनंतर खेळातील नियम पुर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीविषयी भाकीत करणे अत्यंत कठीण ठरेल, असे भारताची माजी आॅलिम्पियन नेमबाज अंजली भागवतने सांगितले.
५ आॅगस्ट पासून सुरु होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांबद्दल अंजलीने सांगितले की, ‘‘स्पर्धेतील पदकाच्या अपेक्षाविषयी बोलणे कठीण आहे. लंडन आॅलिम्पिकनंतर सगळेच नियम बदलले आहेत आणि आता पात्रता फेरीचे गुण अंतिम फेरीतील गुणांसह जोडले जात नाही. निशानेबाजाला अंतिम फेरीत पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. अंतिम फेरीतील गुणावरुनच पदक निश्चित होणार असल्याने अंतिम फेरीत पोहचल्यानंतर खेळाडूंना पात्रता फेरीतील कामगिरी पुर्णपणे विसरुन नव्याने सुरुवात करावी लागेल.’’ (वृत्तसंस्था)
अभिनव बिंद्राची गोष्टच निराळी आहे. त्याने आपल्या अखेरच्या आशियाई स्पर्धेत कोरिया आणि जपानच्या जागतिक दर्जाच्या नेमबाजांना मागे टाकून सुवर्ण जिंकले. रिओ स्पर्धा बिंद्राची अखेरची आॅलिम्पिक असल्याने माझ्यामते आशियाई स्पर्धेसारखेच यश तो यावेळी मिळवेल. - अंजली भागवत