संघकाराचे वल्र्डकपनंतर निवृत्तीचे संकेत

By admin | Published: November 23, 2014 02:25 AM2014-11-23T02:25:46+5:302014-11-23T02:25:46+5:30

लंकेचा दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज कुमार संघकारा हा आयसीसी वर्ल्डकप 2क्15नंतर क्रिकेटच्या सर्व प्रकरांतून निवृत्त होऊ शकतो.

Predictive retirement signs of the team | संघकाराचे वल्र्डकपनंतर निवृत्तीचे संकेत

संघकाराचे वल्र्डकपनंतर निवृत्तीचे संकेत

Next
कोलंबो : लंकेचा दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज कुमार संघकारा हा आयसीसी वर्ल्डकप 2क्15नंतर क्रिकेटच्या सर्व प्रकरांतून निवृत्त होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली 14 फेब्रुवारी ते 29 मार्च 2क्15 या कालावधीत आयोजित आयसीसी वर्ल्डकप ही संघकाराची अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल. मीडिया वृत्तानुसार संघकाराने तसे संकेत दिले आहेत.
37 वर्षाच्या संघकाराने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) बैठकीत आपल्या निर्णयाची माहिती आधीच दिली आहे. राष्ट्रीय निवडकत्र्यानी मात्र अशा प्रकारच्या बैठकीचा इन्कार केला; पण एसएलसीच्या 
सूत्रंनी संघकाराने बोर्डाला अपाला निर्णय कळविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. इतकेच नव्हे, तर ही माहिती लवकरच सार्वजनिक करण्यात 
येणार आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Predictive retirement signs of the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.