प्रीती झिंटा - नेस वाडिया वाद

By admin | Published: April 8, 2015 03:47 PM2015-04-08T15:47:09+5:302015-04-08T15:47:09+5:30

आयपीएलमधील सामन्यादरम्यान नेस वाडियांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप प्रीती झिंटाने केला.

Preeti Jhinta - Ness Wadia controversy | प्रीती झिंटा - नेस वाडिया वाद

प्रीती झिंटा - नेस वाडिया वाद

Next
>किंग्ज इलेव्हन पंजाब हा संघ विकत घेत नेस वाडिया व प्रीती झिंटा यांनी क्रिकेट क्षेत्रात पाऊल टाकले. मात्र आयपीएलमध्येच या दोघांच्या नातेसंबंध ताणले गेले व हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. आयपीएलच्या सामन्या दरम्यान नेस वाडियांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप प्रीती झिंटाने केला व आयपीएलमध्ये नवा वाद निर्माण झाला. 
गेल्या वर्षी ३० मेरोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना सुरु होता. या सामन्या दरम्यान प्रीती झिंटा व नेस वाडिया यांच्यात शाद्बिक बाचाबाची झाली व यानंतर नेस वाडियांनी विनयभंग केला अशी तक्रार प्रीतीने मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात केली. नेस वाडियांनी सर्वांसमक्ष मला शिवीगाळ करत माझा हातही खेचला असे प्रीतीने म्हटले होते. प्रीती व नेस वाडिया या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही वर्षांनी त्यांचे संबंध तुटले.  हे प्रकरणही न्यायप्रवीष्ट असून प्रीती व नेस वाडिया यांच्यातील वादाने आयपीएल मात्र चर्चेतच राहिले. 

Web Title: Preeti Jhinta - Ness Wadia controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.