कॅबकडून २५० व्या कसोटी सामन्याची तयारी जोरात

By admin | Published: September 26, 2016 12:10 AM2016-09-26T00:10:54+5:302016-09-26T00:10:54+5:30

भारत आणि न्युझिलंड दरम्यान ३० रोजी ईडन गार्डन्सवर होणारा कसोटी सामना हा भारतीय संघाचा आपल्याच देशात खेळला जाणारा २५० वा सामना आहे.

The preparation of the 250th Test match from the CAB loudly | कॅबकडून २५० व्या कसोटी सामन्याची तयारी जोरात

कॅबकडून २५० व्या कसोटी सामन्याची तयारी जोरात

Next

कोलकाता : भारत आणि न्युझिलंड दरम्यान ३० रोजी ईडन गार्डन्सवर होणारा कसोटी सामना हा भारतीय संघाचा आपल्याच देशात खेळला जाणारा २५० वा सामना आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याची विशेष तयारी केली आहे.
भारतीय संघाचा भारतातच खेळला जाणारा हा २५० वा सामना आहे. कॅबने यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लॉर्डस् प्रमाणेच घंटा वाजवून सामन्याला सुरुवात होईल. त्यासोबतच दोन्ही संघांना सन्मानित केले जाईल.
कॅबचे संयुक्त सचिव अभिषेक डालमिया यांनी म्हटले की,‘‘ भारतीय भुमिवर होणारा २५० वा सामना हा विशेष असेल. बंगालचे दोन क्रिकेटर रिद्धीमान साहा, आणि मोहम्मद शमी यांनी दुसऱ्या दिवशी सन्मानित केले जाईल. हे दोन्ही खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत.’’
त्यासोबतच कॅबने चार हजार गरिब मुलांना सामना दाखवण्याचे नियोजन केले आहे. त्यांना विशेष ड्रेस देखील दिला जाणार आहे. न्युझिलंडच्या संघाने त्यांचा ईडन्सवरील अखेरचा कसोटी सामना १९६५ मध्ये खेळला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: The preparation of the 250th Test match from the CAB loudly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.