तयारी कसोटीची

By admin | Published: October 29, 2015 10:31 PM2015-10-29T22:31:33+5:302015-10-29T22:31:33+5:30

भारताला भारतात टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत नमविल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ भारतीय दौऱ्यातील मुख्य मालिकेसाठी म्हणजे

Preparation Test | तयारी कसोटीची

तयारी कसोटीची

Next

मुंबई : भारताला भारतात टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत नमविल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ भारतीय दौऱ्यातील मुख्य मालिकेसाठी म्हणजे, कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मुंबईत शुक्रवार-शनिवार या भारत अध्यक्षीय संघाविरुद्ध दोनदिवसीय सराव सामन्याने दक्षिण आफ्रिका आपली दावेदारी मजबूत करेल.
ब्रेबॉन स्टेडियम येथे ३० व ३१ आॅक्टोबरला रंगणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज होण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. या सामन्यात अजूनही आपल्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या हाशीम आमला याच्यावर सर्वांच्या नजरा असतील.
विशेष म्हणजे भारत व द. आफ्रिकामध्ये पहिल्यांदाच चार सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. भारतात आतापर्यंत उभय संघांनी १२ कसोटी खेळल्या असून त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ वेळा बाजी मारली आहे. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत.
हाशिम आमलाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाला सध्या दुखापतींचा सामना करावा लागत आहे. प्रमुख गोलंदाज मॉर्नी मॉर्कल आणि अष्टपैलू जेपी ड्युमिनी हे दोघेही एकदिवसीय मालिकेत जखमी झाल्याने त्यांना संघाबाहेर बसावे लागले. शिवाय, कसोटी मालिकेत यांच्या अनुपस्थितीचाही फटका बसण्याची शक्यता असल्याने या दोघांच्या तंदुरुस्तीकडे द. आफ्रिका संघाचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या बाजूला भारत अध्यक्षीय संघातून कर्णधार चेतेश्वर पुजारा सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज असेल. तसेच,
कसोटी मालिकेआधी द. आफ्रिकेविरुद्ध स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुजाराकडे
ही लढत सुवर्णसंधी आहे, त्याचबरोबर
लोकेश राहुल आणि यष्टिरक्षक - फलंदाज नमन ओझा यांच्या कामगिरीवरही
निवड समितीचे बारीक लक्ष असेल. सध्या भारतीय कसोटी संघात यष्टिरक्षकाची जबाबदारी वृद्धीमान साहाकडे असून, सराव सामन्यातून स्वत:ची छाप पाडण्यास ओझा प्रयत्नशील असेल.

Web Title: Preparation Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.