चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गोलंदाजांची तयारी अपूर्ण : बाँड
By admin | Published: May 17, 2017 04:06 AM2017-05-17T04:06:08+5:302017-05-17T04:06:08+5:30
नियमित व्यस्त राहणारे आघाडीचे आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अपूर्ण तयारीने जाणार आहेत. कारण आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे
दुबई : नियमित व्यस्त राहणारे आघाडीचे आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अपूर्ण तयारीने जाणार आहेत. कारण आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना नियमित नेट प्रॅक्टिसची संधी मिळाली नाही, असे मत न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडने व्यक्त केले.
आयसीसीसाठी आपल्या स्तंभात बाँडने म्हटले आहे की, आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे गोलंदाजांना नेट््समध्ये नियमित सराव करता आला नाही. गोलंदाजांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करताना अडचण भासेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आघाडीच्या गोलंदाजांना १० षटकांचा कोटा पूर्ण करावा लागतो. पण आयपीएलमध्ये त्याची त्यांना सवय नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्यांना कोटा पूर्ण करताना अडचण भासेल. २० षटकांच्या क्रिकेटनंतर ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सहभागी होताना खेळाडूंना अधिक मेहनत घ्यावी लागेल. इंग्लंड व वेल्समध्ये होणारी स्पर्धा आयपीएलपेक्षा वेगळी आहे. तेथे भारतासारखे उष्ण वातावरण राहणार नाही, ही दिलासा देणारी बाब आहे.’ (वृत्तसंस्था)