राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणीची तयारी सुरू

By admin | Published: November 7, 2016 05:49 AM2016-11-07T05:49:28+5:302016-11-07T05:49:28+5:30

शहर तालीम संघाने राज्यस्तरीय कुस्ती कुमार गट स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. संघाच्या वतीने कुमार गटाची निवड चाचणी ८ नोव्हेंबर रोजी वडाळ््यातील भारतीय क्रीडा भवन येथे रंगणार आहे

Preparing for state-level wrestling selection test | राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणीची तयारी सुरू

राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणीची तयारी सुरू

Next

मुंबई : शहर तालीम संघाने राज्यस्तरीय कुस्ती कुमार गट स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. संघाच्या वतीने कुमार गटाची निवड चाचणी ८ नोव्हेंबर रोजी वडाळ््यातील भारतीय क्रीडा भवन येथे रंगणार आहे. मंगळावारी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत खेळाडूंचे वजन तपासल्यानंतर, १२ वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
१२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा धुळे येथील क्रीडा संकुलात रंगणार आहे. निवड चाचणीतील विजेत्या कुस्तीपटूंमधून राज्यस्तरीय संघाची निवड करण्यात येणार आहे.
४२ किलो, ४६ किलो, ५० किलो, ५४ किलो, ५८ किलो, ६३ किलो, ६९ किलो, ७६ किलो आणि ७६ किलोवरील वजनी गटात स्पर्धा पार पडणार आहे.
या स्पर्धेत कुमार गटातील कुस्तीपटूची जन्मतारीख १ जानेवारी २००० नंतरची असावी अशी मुख्य अट आहे. त्याचप्रमाणे, कुस्तीपटूंनी सोबत जन्माचा दाखला आणि आधार कार्ड बाळगणे बंधनकारक असल्याचीही माहिती आयोजकांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Preparing for state-level wrestling selection test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.