राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांनी दिल्या विजेंदरला शुभेच्छा

By Admin | Published: July 18, 2016 06:24 AM2016-07-18T06:24:45+5:302016-07-18T06:25:04+5:30

चॅम्पियनशिप स्पर्धेत मात करत स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचणाऱ्या पहिला भारतीय बॉक्सर विजेंदर याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

President, Prime Minister gave Vijender a wish | राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांनी दिल्या विजेंदरला शुभेच्छा

राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांनी दिल्या विजेंदरला शुभेच्छा

googlenewsNext


नवी दिल्ली : आॅस्टे्रलियाचा अनुभवी बॉक्सर केरी होप याच्यावर डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियनशिप स्पर्धेत मात करत स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचणाऱ्या पहिला भारतीय बॉक्सर विजेंदर याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. या स्टार बॉक्सरने देशाचा गौरव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विजेंदर याने वेल्समध्ये जन्मलेल्या आॅस्ट्रेलियाच्या बॉक्सर केरी होपला नमवले होते. त्यानिमित्त देशभरातून विजेंदर याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनुभवी बॉक्सर केरी होप याचे कोणतेही दडपण न घेता भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंग याने १० राउंडच्या लढतीत ही झुंजार बाजी मारली होती. हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला.
>बॉक्सर विजेंदर याचे अगदी मनापासून अभिनंदन! तुझ्या विजयामुळे संपूर्ण देशाची मान उंचावली आहे.
- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती
>विजेंदर, तू कठीण समजली जाणारी स्पर्धा जिंकली. यानिमित्त तुझे अभिनंदन! तू विजेतेपदाचा हकदार होताच. तुझी अफाट ताकद, कौशल्य यातून साकारलेला हा शानदार विजयाचा नमुना आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
>डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियनशिप स्पर्धेत विजय मिळवल्याचा आनंद काही औरच आहे. हा विजय महान बॉक्सरपटू स्वर्गीय मोहम्मद अली यांना अर्पण. आगामी काही दिवस या विजयाचा आनंद लुटणार आहे. पाकिस्तानात जन्मलेला ब्रिटिश स्टार आमिर खान याच्याविरुद्ध लढण्याची आता मनीषा आहे.
- विजेंदरसिंग, भारतीय बॉक्सर

Web Title: President, Prime Minister gave Vijender a wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.