अध्यक्षीय कॅरम स्पर्धा सोमवारपासून, गिरीश - काजलला अग्र मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:10 PM2019-03-17T12:10:46+5:302019-03-17T12:11:02+5:30
८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला सोमवारी १८ तारखेला सुरुवात होत आहे
मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट माटुंगा यांच्या संयुक्त विधमाने ८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला सोमवारी १८ तारखेला सुरुवात होत आहे. सेंट्रल रेल्वेच्या वेल्फेअर हॉल, माटुंगा येथे ही स्पर्धा रंगणार असून पुरुष एकेरी, महिला एकेरी व १८ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत मुंबईतील एकंदर १७६ खेळाडूंनी भाग घेतला आहे. पुरुष एकेरी गटात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला प्रथम मानांकन देण्यात आले असून ,महिला एकेरीत इंडियन ऑईलचा काजल कुमारीला प्रथम मानांकन मिळाले आहे. तर १८ वर्षांखालील मुलांमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला अग्र मानांकन देण्यात आले आहे.
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे.
पुरुष एकेरी : १) गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ), २) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ), ३) संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ), ४) सलमान खान ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग ) , ५) अभिषेक भारती ( एस. एस. ग्रुप ), ६) फैझान अन्सारी ( एस. एस. ग्रुप ), ७) अमोल सावर्डेकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. मी. जोशी मार्ग ) ८ ) फहीम काझी ( वरळी स्पोर्ट्स क्लब )
महिला एकेरी : १) काजल कुमारी ( इंडियाला ऑइल ), २) नीलम घोडके ( जैन इरिगेशन ), ३) सुषमा परदेशी ( शिवतारा कॅरम क्लब ), ४) मिताली पिंपळे ( जैन इरिगेशन ), ५) शिल्पा पळणिटकर ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) ६) वैभवी शेवाळे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ , ना. म. जोशी मार्ग ) ७) शुभदा नागावकर ( रिझर्व्ह बँक ) ८) मालती केळकर ( आयकर स्पोर्ट्स क्लब )
१८ वर्षांखालील मुले : १) नीरज कांबळे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ), २) अंकित मोहिते ( विजय कॅरम क्लब ), ३) ओजस जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ , नायगाव ) ४) रोहित गमरे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ), ५) नीलांश चिपळूणकर ( ए. के. फाऊंडेशन ), ६) स्मिथ जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ), ७) जुनैद शेख ( एस. एस. ग्रुप ), ८) शुभम कांबळे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव )