'पंतप्रधान मोदींच्या ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमामुळे नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताहेत!'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:43 PM2021-08-18T14:43:48+5:302021-08-18T14:44:22+5:30
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. नीरज चोप्रानं भालाफेकीत सुवर्ण जिंकून इतिहास घडवला, तर वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यक्रांती घडवली. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघानं कांस्टपदक जिंकले. ४१ वर्षांनंतर हॉकीत भारतानं ऑलिम्पिक पदक जिंकेल, तर सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला अन् खेळाडूंचे कौतुक केले.
रोहित शर्माची विक्रमी कामगिरी, कसोटी सलामीवीर म्हणून दोन वर्षांत घेतली गरूड भरारी!
''नीरज चोप्रासारखे युवक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले, ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील ४-५ वर्षांच्या अथक मेहनतीमुळे,''असा दावा केंद्रीय मंत्री देवूसिंह चौहान यांनी केला आहे. ( Prime Minister Narendra Modi’s hard work of four to five years was behind youths like Neeraj Chopra getting gold medal in Olympics, Union Minister of State for Communications Devusinh Chauhan said). गुजरात येथील जन आशीर्वाद यात्रेला संबोधित करताना चौहान यांनी हे मत मांडले. ते म्हणाले,''भारतीय महिला खेळाडू पदक जिंकतात किंवा नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकत आहेत... या खेळाडूंच्या मागे मोदी साहेब यांची ४-५ वर्षांचे अथक परिश्रम आहेत.''
मीराबाई चानूच्या 'त्या' कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, हेच संस्कार महत्त्वाचे!
टोक्यो ऑलिम्पिकमधील सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. ( PM Narendra Modi interaction with Tokyo 2020 Olympic contingent) यावेळी पंतप्रधान मोदींनी सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू रवी कुमार दहिया व बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, पुरुष हॉकी संघातील खेळाडू यांच्यासह सर्व खेळाडूंशी चर्चा केली. यावेळी मोदींनी मीराबाई चानूचे कौतुक केले.
ते म्हणाले,''तू पदक जिंकून देशाचं नाव आणखी मोठं केलंस, पण तुझ्या एका कृतीनं मी खूप आनंदी आहे. तू ड्रायव्हर्सचा केलेला सत्कार. पदक जिंकण्याचा अभिमान बाळगणं आणि त्यानंतर आठवणीनं त्यांचा सत्कार करणं, हे आपल्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन आहे. यातून देशातील सर्व लोकांना प्रेरणा मिळेल आणि हेच लोग होते की ज्यांचा तुझ्या यशात वाटा आहे.