मुंबई : जान्हवी बहाडकरचे पंतप्रधानांनी केले कौतुक, 'फ्लोअर बॉल'मध्ये दैदिप्यमान कामगिरी

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 20, 2025 18:22 IST2025-03-20T18:21:47+5:302025-03-20T18:22:30+5:30

महिला 'फ्लोअरबॉल' खेळात भारतीय संघाने कांस्य पदक पटकावले. या संघात जान्हवीही होती.

Prime Minister praises Janhvi Bahadkar for her brilliant performance in 'Floor Ball' | मुंबई : जान्हवी बहाडकरचे पंतप्रधानांनी केले कौतुक, 'फ्लोअर बॉल'मध्ये दैदिप्यमान कामगिरी

मुंबई : जान्हवी बहाडकरचे पंतप्रधानांनी केले कौतुक, 'फ्लोअर बॉल'मध्ये दैदिप्यमान कामगिरी

मुंबई - न्यू म्हाडा कॉलनी दिंडोशी, इमारत क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या कु.जान्हवी  बहाडकर हिने इटली येथे पार पडलेल्या विशेष हिवाळी ऑलिंपिकमध्ये दैदिप्यमान कामगिरी केली.

महिला 'फ्लोअरबॉल' खेळात भारतीय संघाने कांस्य पदक पटकावले.तिने कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने भारताचे आणि पर्यायाने आपल्या कॉलनीचे सुद्धा नाव उज्ज्वल केले आहे.तिच्यासह या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सत्कार केला.

 न्यू म्हाडा दिंडोशी फेडरेशनतर्फे येत्या ३१मार्च रोजी विशेष मान्यवरांच्या उपस्थित म्हाडा क्रीडा महोत्सवात कु. जान्हवी हिचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती फेडेरेशन अध्यक्ष सुनील थळे यांनी दिली.

Web Title: Prime Minister praises Janhvi Bahadkar for her brilliant performance in 'Floor Ball'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.