पंतप्रधानांनी घेतली मल्लांच्या आॅलिम्पिक तयारीची माहिती

By admin | Published: November 1, 2015 02:57 AM2015-11-01T02:57:54+5:302015-11-01T02:57:54+5:30

रियो आॅलिम्पिकसाठी भारतीय मल्ल कशी तयारी करीत आहेत, त्यांचा सरावातील प्रोग्रेस आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा आदींबाबतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जाणून घेतली.

The Prime Minister took part in the preparations for the Olympics | पंतप्रधानांनी घेतली मल्लांच्या आॅलिम्पिक तयारीची माहिती

पंतप्रधानांनी घेतली मल्लांच्या आॅलिम्पिक तयारीची माहिती

Next

नवी दिल्ली : रियो आॅलिम्पिकसाठी भारतीय मल्ल कशी तयारी करीत आहेत, त्यांचा सरावातील प्रोग्रेस आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा आदींबाबतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जाणून घेतली.
सरदार पटेल यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘रन फॉर युनिटी’ला हिरवी झंडी दाखविल्यानंतर त्यांच्या शेजारी उपस्थित असलेले महाबली सतपाल यांच्याकडून त्यांनी मल्लांच्या तयारीचा आढावा घेतला. सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त या आॅलिम्पिक पदकविजेत्या मल्लांचे गुरू सतपाल हे एकता दौडीच्या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘मोदी यांनी आधी माझ्याबद्दल जाणून घेतले. नंतर आॅलिम्पिकसाठी मल्लांची तयारी कशी आहे, याबद्दल विचारले. पंतप्रधानांचे खेळाडूंबद्दल सकारात्मक विचार आहेत. त्यांनी मला जो सन्मान दिला त्याने मी आश्चर्यचकित झालो.’’
सतपाल पुढे म्हणाले, ‘‘आॅलिम्पिक रौप्यविजेता सुशीलकुमार याच्याबद्दल मोदी यांनी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. या वेळी उपस्थित गृहमंत्री राजनाथसिंह
यांनीही सुशीलच्या तयारीची विचारणा केली. सुशीलच्या तयारीने गेल्या दोन महिन्यांत आणखी वेग घेतल्याची माहिती मी दोन्ही मान्यवरांना दिली. दोघांनीही मल्लांच्या यशाबद्दल माझ्याकडे शुभेच्छा व्यक्त केल्या.’’
(वृत्तसंस्था)

Web Title: The Prime Minister took part in the preparations for the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.