रिओत तिरंदाजी संघाला अग्रमानांकन
By Admin | Published: September 17, 2015 12:51 AM2015-09-17T00:51:34+5:302015-09-17T00:51:34+5:30
पात्रता फेरीत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर राहुल बॅनर्जी, जयंत तालुकदार आणि मंगल सिंग चाम्पिया यांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष रिकर्व्ह
रिओ दि जिनेरियो : पात्रता फेरीत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर राहुल बॅनर्जी, जयंत तालुकदार आणि मंगल सिंग चाम्पिया यांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाला रिओे आॅलिम्पिक चाचणी तिरंदाजी स्पर्धेत अव्वल मानांकन मिळाले आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भारताच्या महिला संघाला स्पर्धेत १२ वे मानांकन मिळाले आहे.
राहुल बॅनर्जीने भारतीय खेळाडूंमधून शानदार कामगिरी करताना एकूण ७२ बाणांच्या मानांकन फेरीमध्ये ७२० पैकी ६६८ गुणांची कमाई केली आणि सातव्या स्थानासह मुख्य फेरीत जागा
निश्चित केली. त्याचवेळी जयंत तालुकदार याने ६६६ गुणांची कमाई करून ११व्या स्थानी झेप घेतली. तसेच मंगल सिंगने ६६२ गुणांसह १७वे स्थान मिळवत पुढील फेरीत आगेकूच केली. या तिघांच्या सांघिक कामगिरीनुसार भारतीय संघाचे एकूण १,९९६ गुण झाले व त्यांना याजोरावर चाचणी स्पर्धेत अग्रमानांकन मिळवले.
मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतासमोर १६व्या मानांकीत ब्राझीलचे आव्हान असेल.
त्याचवेळी वैयक्तिक स्पर्धेमध्ये सातव्या मानांकीत राहूलसमोर आॅलिम्पिक चॅम्पियन कोरियाच्या ओ जिन हियेक याचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)