PKL Auction 2024 : प्रो कबड्डी लीगचा ऐतिहासिक लिलाव! शुभम-अजिंक्यला मिळाले मेहनतीचे फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:30 PM2024-08-17T12:30:00+5:302024-08-17T12:40:58+5:30

pro kabaddi auction 2024 news in marathi : प्रो कबड्डी लीग आपल्या अकराव्या हंगामाकडे कूच करत आहे. 

pro kabaddi auction 2024 news in marathi Ajinkya Pawar got Rs 1.10 crore and Shubham Pawar Rs 70 lakh | PKL Auction 2024 : प्रो कबड्डी लीगचा ऐतिहासिक लिलाव! शुभम-अजिंक्यला मिळाले मेहनतीचे फळ

PKL Auction 2024 : प्रो कबड्डी लीगचा ऐतिहासिक लिलाव! शुभम-अजिंक्यला मिळाले मेहनतीचे फळ

pro kabaddi auction 2024 : प्रो कबड्डी लीग आपल्या अकराव्या हंगामाकडे कूच करत आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी आगामी पर्वासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. दोन दिवसांच्या या लिलावात एकूण ११८ खेळाडूंची खरेदी झाली. काहींना लॉटरी लागली तर काहींना त्यांच्या पदानुसार भाव मिळाला नाही. (Pro Kabaddi League 11th Season Auction) विशेष बाब म्हणजे प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच आठ खेळाडूंनी १ कोटी रूपयांची मर्यादा ओलांडली. तमिळ थलायवाजचा सचिन (२.१५कोटी) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मराठमोळ्या अजिंक्य पवारवर देखील पैशांचा वर्षाव झाला. तर, हरियाणा स्टीलर्सचा मोहंमद रेझा शादलुई चियानेह (२.०७ कोटी) सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. (Ajinkya Pawar pkl 2024 auction)

अजिंक्य पवारला बेंगलुरू बुल्सच्या फ्रँचायझीने १.१० कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले. अजिंक्यला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी इतरही फ्रँचायझींनी संघर्ष केला. तेलुगू टायटन्सने अजिंक्यला खरेदी करण्यासाठी प्रथम बोली लावली होती. बोली लागत गेली पण अखेर बेंगलुरूने मोठी रक्कम देऊन त्याला आपल्या संघाचा भाग बनवले. मला लिलावात चांगली रक्कम मिळाल्याने माझ्यासह माझे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. मला बेंगलुरू बुल्सने खरेदी केले याचा आनंद आहे. त्यांची फ्रँचायझी आणि प्रशिक्षक रनधीर सर यांचा मी आभारी आहे, असे अजिंक्यने सांगितले. तो मूळचा महाराष्ट्रातील आहे. 

शुभम शिंदे झाला लखपती
प्रो कबड्डी लीगच्या लिलावात आणखी एका मराठमोळ्या खेळाडूला लॉटरी लागली. बचावपटू शुभम शिंदे त्याची मूळ किंमत २० लाख रूपयांसह लिलावाच्या रिंगणात होता. पाटणा पायरेट्सने त्याला ७० लाख रूपये देऊन आपल्या ताफ्यात घेतले. १७ फेब्रुवारी १९९९ साली जन्मलेला शुभम महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील आहे. 
 
दरम्यान, डुबकी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रदीम नरवालबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही. पटनाच्या संघाकडून खेळताना त्याने खूप प्रसिद्धी मिळवली. पण, आगामी हंगामात तो बंगळुरु बुल्सकडून खेळताना दिसेल. भारताच्या या स्टार खेळाडूसाठी ७० लाख रुपयांची बोली लागली. सामन्याला एकहाती कलाटणी देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू कोट्यवधीच्या क्लबला मुकल्याने कबड्डी शौकिनांनाही धक्का बसला. 

Web Title: pro kabaddi auction 2024 news in marathi Ajinkya Pawar got Rs 1.10 crore and Shubham Pawar Rs 70 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.