प्रो-कबड्डी २८ जुलैपासून
By admin | Published: June 29, 2017 12:39 AM2017-06-29T00:39:20+5:302017-06-29T00:39:20+5:30
प्रो-कबड्डी लीगचे पाचवे पर्व २८ जुलैपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच १२ संघ सहभागी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रो-कबड्डी लीगचे पाचवे पर्व २८ जुलैपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच १२ संघ सहभागी होणार आहेत. तीन महिने रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण १३८ सामने खेळवले जाणार आहेत.
प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाची बुधवारी मुंबईत घोषणा झाली. यंदा प्रो-कबड्डी लीगची सुरुवात हैदराबादपासून होणार आहे आणि एकूण १२ शहरांत या सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. अंतिम सामना चेन्नईत २८ आॅक्टोबरला खेळवला जाणार आहे.
स्पर्धेच्या सलामीची लढत स्टार खेळाडू राहुल चौधरीच्या नेतृत्वाखालील तेलगू टाइटन्स आणि प्रथमच स्पर्धेत सहभागी होत असलेल्या तामीळ थलाइवास यांच्यादरम्यान होईल. अष्टपैलू अजय ठाकूर हा तामीळ संघाचा मार्की खेळाडू आहे.
स्पर्धेच्या पाचव्या सत्रात सहभागी संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात सहा संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ प्लेआॅफआधी विभागीय स्तरावर खेळेल. त्यानंतर प्लेआॅफमधील तीन क्वॉलीफायर आणि दोन एलिमिनेटर सामने खेळविले जातील. हे सामने मुंबई आणि चेन्नईत खेळवले जातील.