काय राव! डुबकी किंग प्रदीपसह या मराठमोळ्या चेहऱ्याला नावाप्रमाणे मिळाला नाही भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 03:57 PM2024-08-16T15:57:47+5:302024-08-16T16:19:28+5:30
काही स्टार खेळाडू असेही आहेत ज्यांना नावाप्रमाणे किंमत मिळाली नाही.
Pro Kabaddi League 11th Season Auction : प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या हंगामासाठी नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली. काही स्टार खेळाडूंवर पैंशाची अक्षरश: 'बरसात' झाली. प्रो कबड्डी लीगमधून कोट्यवधी कमाई करणाऱ्या क्लबमध्ये सर्वाधिक ८ नावांचा समावेश झाला. हा एक रकॉर्डही आहे.
पण काही स्टार खेळाडू असेही आहेत ज्यांना नावाप्रमाणे किंमत मिळाली नाही. एका बाजूला सचिन तन्वर मोहम्मदरेझा आणि पवन सेहरावत यांनी कोट्यवधीचा आकडा गाठला दुसरीकडे काही स्टार खेळाडू स्वस्तात मस्तच्या वर्गवारीत जाऊन बसले. यात डुबकी किंगसह मराठमोळ्या सिद्धार्थ देसाचाही समावेस आहे.
सिद्धार्थ देसाई
गत हंगामात हरियाणा स्टीलर्सकडून खेळताना दिसलेला सिद्धार्थ देसाई यावेळी नव्या टीमकडून मैदानात उतरेल. दबंग दिल्ली केसी संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. त्याच्यासाठी या संघ मालकांनी २६ लाख रुपये मोजले. मराठमोळा चेहरा ऐकेकाळी सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असायचा. गत हंगामतही त्याने काही फार खराब कामगिरी केली नव्हती. पण त्याच्यावरील बोली अगदी थोडक्यात आटोपली. ही गोष्ट खरंच आश्चर्यकारक अशी आहे.
फजल अत्राचली
इराणचा कबड्डीपट्टू फजल अत्राचली हा जगातील सर्वोत्तम बचावपट्टूपैकी एक आहे. प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामासाठी बंगाल वॉरियर्सनं त्याला फक्त ५० लाख रुपये खर्च करून आपल्या संघात घेतले. संघासाठी ही डील नक्कीच फायद्याचे आहे. कारण इराणी सुल्तान अगदी स्वस्तात मिळाला आहे. हा खेळाडू यापेक्षा अधिक किंमतीसाठी पात्र असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
प्रदीप नरवाल
डुबकी किंग प्रदीम नरवालबद्दल वेगळ सांगण्याची गरज नाही. आगामी हंगामात तो बंगळुरु बुल्सकडून खेळताना दिसेल. भारताच्या या स्टार खेळाडूसाठी ७० लाख रुपयांची बोली लागली. मॅचला एकहाती कलाटणी देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू कोट्यवधीच्या क्लबला मुकला आहे, असेच म्हणावे लागेल.