Pro Kabaddi League 2018: पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालचा सर्वात मोठा पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:28 PM2018-10-30T12:28:55+5:302018-10-30T12:30:19+5:30
Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात हरयाणा स्टीलर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामन्यात पाटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने विक्रमी कामगिरी केली.
Next
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात हरयाणा स्टीलर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामन्यात पाटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने विक्रमी कामगिरी केली. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात त्याने मोठा पराक्रम केला आहे.
When stars collide...🌟#PirateHamlapic.twitter.com/p8OJHIp1sW
— Patna Pirates (@PatnaPirates) October 29, 2018
प्रदीपने या सामन्यात चढाईतील 700 गुणांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू आहे. प्रदीपने अवघ्या 71 सामन्यांत हा पराक्रम केला. याच कामगिरीसाठी राहुल चौधरीला 84 सामने खेळावे लागले. चढाईत सर्वाधिक गुण कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रदीप 713 गुणांसह अव्वल स्थानावर गेला आहे.
चढाईत सर्वाधिक गुण कमावणारे खेळाडू
प्रदीप नरवाल ( पाटणा पायरेट्स) 713
राहुल चौधरी ( तेलगु टायटन्स) 700
अजय ठाकूर ( तमिळ थलायव्हाज) 616
दीपक हुडा ( जयपूर पिंक पँथर्स ) 541
काशिलिंग आडके ( बेंगळुरु बुल्स) 518