Pro Kabaddi League 2018 : हरयाणा स्टीलर्सने विजयाचे खाते उघडले, गुजरातची पाटी कोरीच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 09:03 PM2018-10-12T21:03:20+5:302018-10-12T21:11:17+5:30
Pro Kabaddi League 2018: हरयाणा स्टीलर्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात शुक्रवारी गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघावर 32-25 असा विजय मिळवला.
चेन्नई : हरयाणा स्टीलर्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात शुक्रवारी गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघावर 32-25 असा विजय मिळवला. हरयाणाचा या पर्वातील हा पहिलाच विजय ठरला. मोनू गोयत व कुलदीप सिंग हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
Home sweet home! 🤩🙌
— ProKabaddi (@ProKabaddi) October 12, 2018
A fantastic match between @HaryanaSteelers & @Fortunegiants ends with the home team kicking off their home leg perfectly, winning 32-25. 👏👏 #HARvGUJ#VivoProKabaddi
हरयाणाचे मोनू गोयत आणि कुलदीप सिंग यांना गुजरातच्या सचिनने तोडीस तोड उत्तर दिले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात आक्रमणावरच भर दिला. मात्र, बचावाच्या बाबतीत हरयाणाचे खेळाडू उजवे ठरले. त्याच जोरावर त्यांनी पहिल्या 30 मिनिटांत 20-13 अशी आघाडी घेतली. सहाव्या पर्वातील हरयाणाचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात त्यांना पुणेरी पलटण संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. गुजरातला पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीविरुद्ध 32-32 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
One-way traffic! @HaryanaSteelers open their home leg on the front foot and lead @Fortunegiants 20-13 at half-time! The 2nd half could be a cracker! Stay tuned to Star Sports for all the LIVE action!#VivoProKabaddi#HARvGUJ
— ProKabaddi (@ProKabaddi) October 12, 2018
पहले हॉफ में दिखा हरियाणा स्टीलर्स का धाकड़ अंदाज, स्कोर 20-13 👏🙌
— Haryana Steelers (@HaryanaSteelers) October 12, 2018
Our #DhaakadBoys put on a fantastic performance at Motilal Nehru School of Sports. 👏🙌
At half time we lead 20-13.#ShaanSeSteelerspic.twitter.com/OQYTrAvE7S
दुसऱ्या सत्रात सचिन आणि के प्रपांजन यांनी कडवी झुंज देताना गुजरातची पिछाडी कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी सुनील कुमारचीही चांगली साथ लाभली. मात्र थोड्या फरकाने त्यांना हा सामना गमवावा लागला.
And we have a successful review! ☺️
— Haryana Steelers (@HaryanaSteelers) October 12, 2018
Monu is back in the mix as well with our score 27-22.
Let's bring it home, #DhaakadBoys! 💪#HARvGUJ#ShaanSeSteelers#ProKabaddi