Pro Kabaddi League 2018 : टायटन्सकडून योद्धाची यशस्वी 'पकड'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 09:08 PM2018-10-13T21:08:56+5:302018-10-13T21:09:57+5:30
पहिल्या सत्रात तेलुगू टायटन्स संघाने जोरदार पकडी आणि बोनस गुण कमावत यूपी योद्धा संघावर वरचष्मा राखला. त्यामुळे तेलुगूच्या संघाला पहिल्या सत्रात १८-१३ अशी पाच गुणांची आघाडी घेता आली.
चेन्नई : प्रो-कबड्डी लीगमधील तेलुगू टायटन्सने केलेल्या यश्स्वी पकडींच्या जोरावर त्यांनी यूपी योद्धा संघाला 34-29 असे पराभूत केले. यूपीचा कर्णधार रिशांक देवाडिगा बराच काळ मैदानाबाहेर होता, त्याचबरोबर त्याला अन्य खेळाडूंची अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
FULL-TIME!
— UP YODDHA (@UpYoddha) October 13, 2018
Utaar-Chadaav se bhara hua game lekin antim ghadi mein Titans ko mili jeet.
Focus ab kal Pirates ko maat dene par! #HYDvUP#YoddhaHum#SaansRokSeenaThokpic.twitter.com/FjPDdREv5I
पहिल्या सत्रात तेलुगू टायटन्स संघाने जोरदार पकडी आणि बोनस गुण कमावत यूपी योद्धा संघावर वरचष्मा राखला. त्यामुळे तेलुगूच्या संघाला पहिल्या सत्रात १८-१३ अशी पाच गुणांची आघाडी घेता आली. तेलुगूच्या दोन्ही टोकाकडून चांगला बचाव पाहायला मिळाला. कर्णधारपद भूषवत असलेल्या विशाल भारद्वाजने यावेळी चांगला बचाव केला.
The whistle goes for half-time! @Telugu_Titans hold the edge over @UpYoddha, and lead 18-13. Don't miss this second half, LIVE on Star Sports. #HYDvUP#VivoProKabaddi
— ProKabaddi (@ProKabaddi) October 13, 2018
सामन्याच्या सुरुवातीपासून यूपीचा कर्णधार रिशांक देवाडिगा आणि राहुल चौधरी यांच्याकडून संघांना फोर मोठ्या अपेक्षा होत्या. पण या दोघांनाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण संघातील युवा खेळाडूंना मात्र सामन्यात चांगले रंग भरले. त्यामुळेच ही लढत अटीतटीची झाली.
Half way into the first half, it's absolutely neck and neck between @Telugu_Titans and @UpYoddha.
— ProKabaddi (@ProKabaddi) October 13, 2018
Who do you think will take a lead into half-time? Keep your eyes on Star Sports! #HYDvUP