Pro Kabaddi League 2021-22: कुठे पाहाल लाईव्ह सामने? काय आहेत नियम? कोण आहेत कर्णधार.. वाचा एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:59 PM2021-12-21T21:59:30+5:302021-12-21T22:00:23+5:30
१२ संघांंमध्ये ६६ सामन्यांचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्रातील खूप सारे खेळाडू विविध संघातून खेळत आहेत.
U Mumba vs Bengaluru Bulls Pro Kabaddi 2021 : क्रिकेटच्या दोन लोकप्रिय स्पर्धांचा भारतीय क्रीडाप्रेमींनी गेल्या काही महिन्यांमध्ये आनंद लुटला. आता उद्यापासून कबड्डीचे सामने क्रीडाप्रेमींचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. प्रो कबड्डी स्पर्धेची उद्यापासून सुरूवात होणार असून उद्या तीन सामने खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला आज सर्व संघांच्या कर्णधारांनी आपापल्या संघाची रणनिती, सुरूवातीच्या सामन्यांसाठी केलेल्या योजना आणि इतर तयारी याबद्दल क्रीडाप्रेमींना माहिती दिली. आता उद्यापासून १२ संघांमध्ये एकूण ६६ सामन्यांचा खेळ रंगणार आहे.
कुठे अन् कधी पाहाल लाईव्ह सामने?
कोरोनामुळे गेल्या वर्षी रद्द करण्याची आलेली प्रो कबड्डी यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा रंगणार आहे. दोन वर्षांनी पुन्हा एकदा कबड्डीप्रेमींना पर्वणी असणार आहे. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना उद्या संध्याकाळी ७.३० ला खेळला जाणार आहेत. यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बुल्स असा तो सामना आहे. कबड्डीचे सर्व सामने प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आणि डिस्नी+ हॉटस्टारवर लाईव्ह पाहायला मिळतील.
काय आहेत महत्त्वाचे नियम?
- पूर्ण सामना दोन भागांत खेळला जाईल. पूर्वार्ध २० मिनिटांचा असेल आणि उत्तरार्धही तितक्याच वेळाचा असेल.
- एका सामन्यादरम्यान एक संघ जास्तीत जास्त पाच खेळाडूंची आदलाबदली करू शकेल.
- दोन्ही संघांकडे एक-एक रिव्ह्यू ची सुविधा असेल. रिव्ह्यू योग्य असल्यास तो रिव्ह्यू कायम राहिल.
- बोनस पॉईंट, सुपर रेड, सुपर टॅकल, सुपर-१०, हाय-फाईव्ह आणि डाय रेड हे सारे नियम पूर्वीच्या हंगामांप्रमाणेच असतील.
कोणत्या संघांचा कोण कर्णधार?
बंगाल वॉरियर्स - मणिंदर सिंग
दबंग दिल्ली - जोगिंदर नरवाल
गुजरात जायंट्स : सुनील कुमार
बंगळुरु बुल्स - पवन सेहरावत
हरियाणा स्टीलर्स - विकास कंडोला
जयपुर पिंक पँथर्स - दीपक हुड्डा
पटना पायरेट्स - प्रशांत कुमार राय
पुणेरी पलटण - नितिन तोमर
तमिळ थलायवाज - सुरजीत सिंह
तेलुगु टायटन्स - रोहित कुमार
यूपी योद्धा - नितेश कुमार
यू मुंबा - फजल अत्राचली