Pro Kabaddi League 2021-22: 'बंगळुरू बुल्स'च्या प्रशिक्षकांनी 'यू मुंबा'ला डिवचलं; सामन्याआधीच लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 04:02 PM2021-12-21T16:02:45+5:302021-12-21T16:35:03+5:30

यू मुंबा संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. यू मुंबा संघाने अनेकदा चांगली कामगिरी करून दाखवली आहे. या संघाला बुल्स संघाच्या प्रशिक्षकांनी चांगलंच डिवचलं आहे.

Pro Kabaddi League 2021-22 Bengaluru Bulls Coach Randhir Sehrawat Taunts U Mumba says I build stars not buy them at auctions | Pro Kabaddi League 2021-22: 'बंगळुरू बुल्स'च्या प्रशिक्षकांनी 'यू मुंबा'ला डिवचलं; सामन्याआधीच लगावला टोला

Pro Kabaddi League 2021-22: 'बंगळुरू बुल्स'च्या प्रशिक्षकांनी 'यू मुंबा'ला डिवचलं; सामन्याआधीच लगावला टोला

googlenewsNext

U Mumba vs Bengaluru Bulls Pro Kabaddi 2021 : प्रो कबड्डी ही महत्त्वाकांक्षी स्पर्धा २०१४पासून सुरू झाली. या स्पर्धेचा आठवा हंगाम उद्यापासून सुरू होणार आहे. या हंगामासाठी सर्वच संघ कंबर कसून तयार आहेत. कबड्डी आणि भारतीयांचं नातं फार जुनं असल्याने भारतात या स्पर्धेला चांगलीच पसंती मिळताना दिसते. या स्पर्धेचा आठवा हंगाम (PKL 8) बंगळुरू बुल्स विरूद्ध यू मुंबा या सामन्याने सुरू होणार आहे. या सामन्याआधी बंगळुरू बुल्सचे प्रशिक्षक रणधीर सिंह सेहरावत यांनी यू मुंबा संघाला खोचक टोला लगावला.

यू मुंबा संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. यू मुंबा संघाने गेल्या सात हंगामात अनेकदा चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यांची पहिली लढत बंगळुरू बुल्स आहे. बंगळुरू बुल्स संघाची खास गोष्ट म्हणजे त्यांनी स्पर्धा सुरू झाल्यापासून एकदाही संघाचे प्रशिक्षक बदललेले नाहीत. इतर संघाचे अनेक प्रशिक्षक आले आणि गेले पण बंगळुरू संघाने मात्र रणधीर सेहरावत यांची साथ कधीही सोडली नाही. सेहरावत यांनीदेखील आपल्या नावलौकिकाला साजेसे असे खेळाडू घडवले. अजय ठाकूर, मनजीत चिल्लरपासून ते पवन सेहरावत अन् प्रदीप नरवालपर्यंत अनेक खेळाडूंच्या जडणघडणीत रणधीर यांचा मोलाचा वाटा होता. आता आठव्या हंगामासाठीदेखील रणधीर सेहरावत आपल्या संघासमवेत सज्ज आहेत. पहिल्या सामन्याआधी रणधीर यांनी स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या यू मुंबा संघाला एक टोमणा लगावला आहे.

बंगळुरू संघाने यंदाच्या लिलावात फारसे महागडे खेळाडू विकत घेतले नाहीत. त्याऐवजी त्यांनी सर्व लक्ष नव्या दमाच्या खेळाडूंवर केंद्रीत केल्याचं दिसलं. याबद्दल जेव्हा रणधीर यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, "कोरोनाच्या काळात या स्पर्धेला विश्रांती मिळाली. या दोन वर्षांच्या कालावधीत मी देशभरात अनेक ठिकाणी फिरलो आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा खेळ पाहिला. जर तुम्ही नव्या आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली नाहीत तर त्यांची कारकिर्द पुढे कशी घडणार? असा विचार मी कायम करत असतो. आणि म्हणूनच मी स्टार खेळाडू विकत घेण्यासाठी लिलावात आटापिटा करत नाही. उलट, जे खेळाडू मी घेतले आहेत, त्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देऊन भविष्यातील स्टार खेळाडू बनवण्याचा माझा प्रयत्न असतो."

"महाराष्ट्रातील काही प्रशिक्षक गावाकडच्या मुलांना संधी देण्यास तयार नसतात. ते मुंबईतील खेळाडूंवर आपला डाव खेळतात. पण माझी विचार करण्याची पद्धत थोडीशी निराळी आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू निवडतो आणि त्यांना संधी देतो. यंदाच्या हंगामात आमची योजना ठरलेली होती. एका खेळाडूंवर संपूर्ण संघाने अवलंबून राहण्यापेक्षा कमी अनुभवी पण प्रतिभावान असलेल्या खेळाडूंना संघात स्थान देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यानुसार आम्ही संघाची बांधणी केली आहे. पवनशिवाय आणखीही काही आघाडीचे चढाईपटू मला आमच्या संघात घेता आले याचा मला आनंद आहे. माझा संघासाठीचा विचार अतिशय सरळ आहे. मी वैयक्तिक नात्याबद्दल विचार करत नाही तर सामन्याची आणि स्पर्धेची नक्की काय गरज आहे ते पाहतो आणि त्यानुसार संघ निवडतो", असेही रणधीर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pro Kabaddi League 2021-22 Bengaluru Bulls Coach Randhir Sehrawat Taunts U Mumba says I build stars not buy them at auctions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.