Pro Kabaddi League 2021-22: दीड मिनिटांत ग्रह फिरले अन् गुजरातवर हरयाणा भारी पडले; पुण्यानं आघाडी घेऊनही बंगळुरूकडून मानली हार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 09:42 PM2022-01-02T21:42:14+5:302022-01-02T21:42:54+5:30
Pro Kabaddi League 2021-22: प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला.
Pro Kabaddi League 2021-22: प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. पहिल्या हाफमध्ये बरेच पिछाडीवर असलेल्या गुजरानं जबरदस्त पुनरागमन करताना सामना ३५-३५ असा बरोबरीत आणला. पण, अखेरच्या दीड मिनिटांत त्यांचे ग्रह फिरले अन् हरयाणानं २ गुणांनी बाजी मारली. दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सनं ४०-२९ अशा फरकानं पुणेरी पलटनचे आव्हान सहज परतवून लावले.
गुजरात जायंट्स पहिल्या सत्रात १०-२२ असे पिछाडीवर होते, परंतु दुसऱ्या सत्रात त्यांना हरयाणा स्टीलर्सला बॅकफूटवर फेकले. अटीतटीच्या या सामन्यात अखेरच्या दीड मिनिटांत हरयाणानं बाजी मारली. हरयाणाच्या विकास कंडोलानं पुन्हा एकदा सुपर १० पॉईंट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. एचएस राकेशच्या सुपर १०च्या जोरावर गुजरातनं सामन्यात कमबॅक केले खरे, परंतु अखेरच्या दीड मिनिटांतील चुका त्यांना महागात पडल्या अन् हरयाणानं ३८-३६ अशा फरकानं हा सामना जिंकला. गुजरातच्या राकेशनं २५ वेळा चढाई करताना १९ गुण आणले. हरयाणाच्या मितूनं १० गुणांची कमाई केली.
What a ʎʌɹnʇ-ʎsdoʇ match 🤯@HaryanaSteelers win leaving all of us looking for our nails.#SuperhitPanga#vivoProKabaddi#GGvHSpic.twitter.com/pRrzJxBTOo
— ProKabaddi (@ProKabaddi) January 2, 2022
आजच्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटनचा पराभव झाला. बंगळुरू बुल्स विरूद्धच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये पुणेरी पलटनकडे १८-१५ अशी आघाडी होती. पण, दुसऱ्या हाफमध्ये बंगळुरूनं खेळ उंचावला. पवन शेरावत या सामन्यातला नायक ठरला. बंगळुरूनं हा सामना ४०-२९ असा जिंकला, त्यात पवनच्या ११ गुणांचा समावेश होता.
Haar ke jeetne wale ko humare yahaan @BengaluruBulls kehte hai! 😎
Bengaluru Bulls script a brilliant comeback to win against Puneri Paltan! 💥#PUNvBLR#SuperhitPanga#vivoProKabaddipic.twitter.com/tGiwgsw9p2— ProKabaddi (@ProKabaddi) January 2, 2022