Pro Kabaddi League 2021-22: हाय व्होल्टेज पंगा! यूपी योद्धा, पुणेरी पलटण अन् जयपूर पिंक पँथर्सचा रोमांचक विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 08:42 PM2021-12-25T20:42:46+5:302021-12-25T23:02:38+5:30
शेवटच्या काही सेकंदात तिन्ही सामन्यांचा निकाल फिरला. यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सला आणि पुण्याने तेलुगू टायटन्सला प्रत्येकी एका गुणाने तर जयपूर पिंक पँथर्सने हरयाणा स्टीलर्सला २ गुणांच्या फरकाने पराभूत केले.
Pro Kabaddi League 2021-22 Day 4 Live Updates : आज झालेले तीनही सामने प्रो कबड्डीच्या इतिहासातील रोमांचक सामन्यांपैकी एक ठरले. अगदी शेवटच्या सेकंदाला यूपी योद्धा आणि पुणेरी पलटणने अनुक्रमे पाटणा पायरेट्स आणि तेलुगू टायटन्सला एका गुणाच्या फरकाने पराभूत केले. तर, जयपूर पिंक पँथर्सने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या आघाडीवर हरयाणा स्टीलर्सला धूळ चारली.
यूपी योद्धाने शेवटच्या सेकंदात जिंकला सामना (३६-३५)
"Yoddha bankar jeet dilana, haan thoda alag laga par chalta hai" - Pardeep Narwal, probably 😉
— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2021
U.P. Yoddha steal a last-second win against Patna Pirates in what was a thrilling #SuperhitPanga 🤯#PATvUP#vivoProKabaddipic.twitter.com/k6SOmeNPzL
पाटणा पायरेट्स आणि यूपी योद्धा दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत होते. सामना सुरू होताच दोन्ही संघांनी आक्रमण केले. त्यामुळे संपूर्ण सामन्यात गुणामधील अंतर खूपच कमी होते. शेवटच्या तीन सेकंदात तर हे अंतर केवळ एका गुणाचे होते. त्यावेळी दोन्ही संघांनी आपापल्या रेड्स उरकल्या. त्यामुळे शेवटची रेड करण्यासाठी यूपी योद्धाचा खेळाडू गेला. त्याला पाटणाच्या खेळाडूंनी पकडलं आणि एक गुण आपल्या नावे केला. पण त्याआधी त्याने बोनस लाईन टच केल्याने यूपी योद्धालाही १ गुण मिळाला. त्यामुळे अखेरीस एका गुणाच्या फरकाने यूपी योद्धाने बाजी मारली.
पुणेरी पलटणने तेलुगू टायटन्सला दिली मात (३४-३३)
Super raids, super tackles, super se bhi upar wala #SuperhitPanga! 😍
— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2021
The amount of 'Super' in this blockbuster was just ♾️ as @PuneriPaltan register a slender win against @Telugu_Titans 🔥#PUNvTT#vivoProKabaddipic.twitter.com/1ewoX6esSg
पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसरा सामनादेखील अटीतटीचा झाला. पुणेरी पलटण आणि तेलुगू टायटन्स दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत होते. तेलुगू टायटन्सने जोर लावला आणि सुरूवातीला आघाडी घेतली. पण हाफ टाईमनंतर सामना हळूहळू पलटला. पुणेरी पलटणने एक रिव्ह्यू घेत सामन्यात रंगत वाढवली. अखेर सामन्याच्या शेवटच्या सेकंदात पुणेरी पलटणने एका गुणाने सामना जिंकला. तेलुगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईने १२ रेड पॉईंट्ससह सामन्यात सर्वाधिक १५ गुण मिळवले. पण पुणेरी पलटणच्या सांघिक कामगिरीपुढे टायटन्सचा निभाव लागला नाही.
जयपूरचा हरयाणावर रोमहर्षक विजय (४०-३८)
Steelers ko maat dekar, season ki pehli jeet Panthers ne kuch iss tarah haasil ki...maza aa gaya! 😍@JaipurPanthers register an enthralling victory over @HaryanaSteelers to conclude Day 4 of #SuperhitPanga! 🤙#JPPvHS#vivoProKabaddipic.twitter.com/uQ6U4ieR2s
— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2021
पहिल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी एका गुणाने विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही तसाच रोमांच पाहायला मिळाला. जयपूर पिंक पँथर्स संघाने अगदी शेवटच्या काही सेकंदांमध्ये आघाडी घेतली. आणि तीच दोन गुणांची आघाडी निर्णायक ठरली. हरयाणाकडून विकासने ९ रेड पॉईंट्स आणि ५ बोनससह १४ गुणांची कमाई केली. पण जयपूरकडून ११ रेड पॉईंट्ससह एकूण १७ गुण मिळवत अर्जून देशवालने संघाला विजय मिळवून दिला.