Pro Kabaddi League 2021-22 Day 4: पुणेरी पलटण आज पुन्हा मैदानात, पाहा आजचे सामने अन् खास आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 03:09 PM2021-12-25T15:09:34+5:302021-12-25T15:12:04+5:30
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात आजच्या चौथ्या दिवशी तीन 'पंगे' रंगणार आहेत.
Pro Kabaddi League 2021-22 Day 4 Preview: कोरोनाच्या धोक्यामुळे बायो-बबल सुरू असलेल्या प्रो कबड्डीच्या स्पर्धेचा सध्या आठवा हंगाम सुरू आहे. या हंगामात पहिल्या तीन दिवसात चुरशीचे सामने पाहायला मिळाले. आता आज चौथ्या दिवशी पुन्ही तीन रंगतदार सामने खेळले जाणार आहेत. पाहूया आजचे तीन सामने आणि त्या संघांचा एकमेकांविरूद्धचा इतिहास...
.@PatnaPirates🆚 Pardeep Narwal
— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2021
Rahul Chaudhari 🆚 @Telugu_Titans
Dharmaraj Cheralathan 🆚 @HaryanaSteelers
Expect Saturday to be housefull!
Don't miss #vivoProKabaddi 7:30 PM onwards, only on Star Sports Network and Disney+Hotstar!#PATvUP#PUNvTT#JPPvHS#SuperhitPangapic.twitter.com/NLfGEybuwR
पटणा पायरेट्स वि. यूपी योद्धा - आज संध्याकाळी ७.३० वाजता पहिला सामन्यात पटणा पायरेट्सचा संघ यूपी योद्धा संघाशी दोन हात करणार आहे. स्पर्धेच्या इतिहासात पटणा आणि यूपी हे दोन संघ एकूण आठ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात चार वेळा पटणाने तर तीन वेळा यूपीने बाजी मारली होती. एक वेळा सामना बरोबरीत सुटला. पण असं असलं तरी दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावल्यामुळे दोघेही आज आपल्या पहिल्या विजयासाठी खेळतील.
पुणेरी पलटण वि. तेलुगू टायटन्स - चौथ्या दिवशी दुसरा सामना पुणेरी पलटण आणि तेलुगू टायटन्स यांच्या रंगणार आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यात तेलुगू टायटन्सनी सामना बरोबरीत सोडवला होता. तर दुसऱ्या दिवशीच्या खेळात पुणेरी पलटणचा पराभव झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे. आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात हे दोन संघ १४ वेळा खेळले असून त्यात पुण्याने सात वेळा तर तेलुगूने सहावेळा बाजी मारली आहे.
जयपूर पिंक पँथर्स वि. हरयाणा स्टीलर्स - आजचा तिसरा सामना जयपूर आणि हरयाणा यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत या हंगामात विजय मिळवलेला नाही. त्यामुळे पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. याआधी हे दोन संघ आठ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातील चार वेळा जयपूरने तर दोन वेळा हरयाणाने सामना जिंकला. तर दोन वेळा सामना बरोबरीत सुटला.