Pro Kabaddi League 2021-22 Day 5: गुजरात-दिल्लीमध्ये झाली 'काँटे की टक्कर'; बंगळुरूने बंगालला एका गुणाने दिली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 11:03 PM2021-12-26T23:03:40+5:302021-12-26T23:05:06+5:30
पाचव्या दिवसाचा पहिला सामना बरोबरीत सुटला तर दुसऱ्या सामन्यात बंगळुरूने बाजी मारली.
Pro Kabaddi League 2021-22 Day 5: प्रो कबड्डीत गेले चार दिवस तीन-तीन सामने होत होते. पण आज मात्र स्पर्धेत दोन सामन्यांचा थरार रंगला. पहिल्या सामन्यात गुजरात आणि दिल्ली यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. तर दुसऱ्या सामन्यात मोक्याच्या क्षणी एका गुणाने बंगळुरूने बंगाल वॉरियर्सला मात दिली.
गुजरात जायंट्स - दबंग दिल्ली सामना बरोबरीत (२४-२४)
Point-point pe likha tha lene waale ka naam 🤯
— ProKabaddi (@ProKabaddi) December 26, 2021
What a game we've had! #GGvDEL ends in a thrilling tie.#SuperhitPanga#vivoProKabaddipic.twitter.com/XrdWt6LZlB
पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवणाऱ्या दबंग दिल्लीने आजच्या सामन्यातही बचावाच्या फळीवर लक्ष केंद्रीत केलं होतं. पण गुजरात जायंट्सच्या खेळाडूंनी अभ्यासपूर्ण रेड्स केल्या. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये गुणांचा फारसा फरक दिसून आला नाही. दिल्लीच्या नवीन कुमारने ८ रेड पॉईंट्स ११ गुण कमावले. तर ७ रेड पॉईंट्ससह ९ गुणांची कमाई केली. या सामन्यानंतर दबंग दिल्ली गुणतालिकेत ३ सामन्यात १३ गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर गुजरातचा संघ ३ सामन्यात ९ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
बंगळुरूने गतविजेत्या बंगालला केलं पराभूत (३६-३५)
Anyone know if Irshad Kamil sa’ab wrote 'Phir se udd chala' for Pawan Sehrawat? 🤔
— ProKabaddi (@ProKabaddi) December 26, 2021
Too many high-flying moments in this epic blockbuster as @BengaluruBulls pull off a remarkable victory!#BLRvBEN#SuperhitPanga#vivoProKabaddipic.twitter.com/CTPSUR5mgd
बंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स या दोनही संघांनी आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांचे गुण १८-१८ होते. त्यानंतरही गुणांमधील फारसे कमी जास्त झाले नाही. पण शेवटच्या टप्प्यात मात्र बंगळुरूने बंगालच्या संघावर विजय मिळवला. बंगालचा कर्णधार मणिंदर सिंग याने १६ रेड पॉईंट्ससह १७ गुण मिळवले. तर बंगळुरूच्या पवन कुमारने १० रेड पॉईंट्ससह १५ गुण मिळवले. पण अखेर बंगळुरूने एका गुणाने विजय मिळवला.