Pro Kabaddi League 2021-22: प्रो कबड्डीच्या ८व्या पर्वाला उद्यापासून सुरूवात होणार; महाराष्ट्राचे २३ सुपुत्र दम दाखवणार, जाणून घ्या कोण कोणत्या संघाकडून खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:23 AM2021-12-21T09:23:54+5:302021-12-21T09:53:21+5:30

Pro Kabaddi League 2021-22 Maharashtra Player's:  प्रो कबड्डी लीगच्या ( PKL) २०२१-२२ पर्वाला २२ डिसेंबरपासून बंगळुरू येथे सुरूवात होत आहे.

Pro Kabaddi League 2021-22: Full Squad Details of All PKL Teams, know Maharashtra's 23 player's full list | Pro Kabaddi League 2021-22: प्रो कबड्डीच्या ८व्या पर्वाला उद्यापासून सुरूवात होणार; महाराष्ट्राचे २३ सुपुत्र दम दाखवणार, जाणून घ्या कोण कोणत्या संघाकडून खेळणार

Pro Kabaddi League 2021-22: प्रो कबड्डीच्या ८व्या पर्वाला उद्यापासून सुरूवात होणार; महाराष्ट्राचे २३ सुपुत्र दम दाखवणार, जाणून घ्या कोण कोणत्या संघाकडून खेळणार

Next

Pro Kabaddi League 2021-22 Maharashtra Player's:  प्रो कबड्डी लीगच्या ( PKL) २०२१-२२ पर्वाला २२ डिसेंबरपासून बंगळुरू येथे सुरूवात होत आहे. कोरोना संबंधित नियमांमुळे ही लीग प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय आयोजकांन घेतला आहे. यंदाच्या पर्वाची सुरुवात एकदम दणक्यात होणार आहे. पहिल्या चार दिवसांत ‘Triple Headers’ असे सामने होतील, तर शनिवारी ‘Triple Panga’ रंगणार आहे. यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स यांच्या लढतीनं प्रो कबड्डीच्या ८व्या पर्वाला सुरुवात होणार. त्यानंतर तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलाव्हाज असा दक्षिण डर्बीचा सामना रंगणार आहे.  यूपी योद्धा समोर गतविजेत्या बंगाल वॉरियर्स यांचे आव्हान असणार आहे. हा सर्व मसाला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चाखता येणार आहे.      
२०१४मध्ये सुरुवात झालेल्या पो कबड्डीचे सातपर्व झाले आहेत. पहिल्या पर्वात जयपूर पिंक पँथर्सनं जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१५मध्ये यू मुम्बाने तर पुढील तीन पर्वात पाटना पायरेट्सनं जेतेपदं पटकावली. २०१८ व २०१९मध्ये अनुक्रमे बंगळुरू बुल्स व बंगाल वॉरियर्स यांनी बाजी मारली. १२ संघ एकमेकांविरुद्ध खेळतील आणि त्यानंतर अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत.

Full Squad Details of All PKL Teams

  1. बंगाल वॉरियर्स - मनिंदर सिंग, रविंद्र कुमावत, सुकेश हेगडे, सुमित सिंग, आकाश पिकलमुंडे, रिशांक देवाडिगा, रिंकू नरवाल, अबोझार मिघानी, विजीन थांगदुराई, प्रविण, रोहित बने, दर्शन जे, सचिन विट्टल, मोहम्मद नबीबक्ष, मनोज गोवडा, रोहित 
  2. बंगळुरू बुल्स - पवन कुमार, बंटी, डाँग ली, अबोल्फजल महाली, चंद्रण रंजित, जीबी मोरे, दीपक नरवाल, अमित शेओरन, सौरभ नंडल, मोहित शेरावत, झियूर रहमान, महेंदर सिंग, मयूर कदम, विकास, अंकित  
  3. दबंग दिल्ली - नवीन कुमार, नीरज नरवाल, इमाद निया, अजय ठाकूर, सुशांस साईल, मोहित, सुमित, मोहम्मद मलाक, जोगिंदर नरवाल, जीवा कुमार, विकास, विजय, बलराम, संदीप नरवाल, मंजीत छिल्लर
  4. गुजरात जायंट्स - परवेश भैन्स्वाल, सुनील कुमार, रवींदर पहल, अजय कुमार, प्रदीप कुमार, गिरीश इर्नाक, रतन के., हर्षित यादव, मनिंदर सिंग, हडी ऑस्तोरॅक, महेंद्र राजपूत, सोनू, सोलेईमन पहलेवनी, हर्मनजित सिंग, अंकित, सुमित.  
  5. हरयाणा स्टीलर्स - रोहित गुलिया, विकास खंडोला, ब्रिजेंद्र सिंग चौधरी, रवी कुमार, सुरेंदर नडा, विकास जग्लान, मोहम्मद मघसोदलौ, विनय, विकास चिल्लर, हमिद नादेर , चांच सिंग, राजेश गुर्जर, अजय घनघास, राजेश नरवाल
  6. जयपूर पिंक पँथर्स - अर्जुन देशवाल, दीपक हुडा, संदीप धुल, नवीन, धर्मराज चेरालथन, अमित हुडा, आमीर होसैन, मोहम्मद नुसरती, अमित कुमा, अमित नागर, अशोक विशाल, नितीन रावल, सचिन नरवाल, पवन टीआर, सुशिल गुलिया, इलावरसन ए. 
  7. पाटना पायटर्स - मोनू, मोहित, राजवीरसिंग चव्हाण, जॅनकून  ली, प्रशांत राय सचिन, गुमन सिंग, मोनू गोयत, नीरज कुमार, सुनील, सौरव गुलिया, संदीप, शुभम शिंदे, साहिल मान, मोहम्मद्रेझा चियानेह, साजिन चंद्रशेखर
  8. पुणेरी पलटन - पवन कुमार काडियन, हाडी ताजिक, बाळासाहेब जाधव, पंकज मोहिते, संकेत सावंत, गोविंद गुरजर, मोहित गोयल, विक्टर ओबिएरो, विशाल भारद्वाज, बलदेव सिंग, राहुल चौधरी, नितीन तोमर, ए सुभाष, सोमबीर, कर्मवीर विश्वास, अभिनेश नादराजन, सौरव कुमार 
  9. तामिळ थलाईव्हाज - मंजीत, सुर्जित सिंग, के. प्रपंजन, अतुल एमएस , अजिंक्य पवार, सौरभ पाटील, हिमांशू, एम. अभिषेक, सागर, भवानी राजपूत, मोहम्मद तरफदर, अन्वर बाबा, साहिल, सागर कृष्णा, संथपनासेलवम 
  10. तेलुगू टायटन्स - राकेश गोवडा, रंजिश, अंकित बेनिवाल, सिद्धार्थ देसाई, ह्यूंसू पार्क, रोहित कुमार, जी राजू, अमित चौहान, मनिष , आकाश चौधरी, आकाश अर्सुल, पिन्स, अबे तेस्तुरो, सुरेंदर सिंग, संदीप, ऋतुराज कोरावी, आदर्श टी., सी. अरुण
  11. यूपी योद्धा - सुरेंदर गिल, प्रदीप नरवाल, मोहम्मद करीम, मोहम्मद महाली, श्रीकांत जाधव, साहिल,  गुलवीर सिंग, अंकित, गौरव कुमार, आशिष  नागर, नितेश कुमार, सुमित, आशू सिंग, नितीन पनवर, गुर्दीप. 
  12. यू मुंबा - फजल अत्राचली, अजिंक्य कापरे, रिंकू, अजित कुमार, मोहसेन जाफरी, हरेंद्र कुमार, अभिषेक सिंग, नवनीत, सुनील सिद्धगवळी, जशनदीप सिंग, राहुल राणा,  अजित, आशिष सागवान, पंकज 

 

महाराष्ट्राचे शिलेदार, करणार कमाल!

  1. श्रीकांत जाधव - यूपी योद्धा
  2. सिद्धार्थ देसाई - तेलुगू टायटन्स
  3. गिरीश इर्नाक - गुजरात जायंट्स
  4. जी बी मोरे - बंगळुरू बुल्स
  5. रिषांक देवाडिगा - बंगाल वॉरियर्स
  6. सौरभ पाटील - तामिळ थलाईव्हाज
  7. ऋतुराज कोरावी - तेलुगू टायटन्स
  8. सुनिल सिध्दगवळी - यू मुंबा
  9. शुभाष शिंदे - पाटना पायरट्स
  10. मयूर कदम - बंगळुरू बुल्स
  11. अजिंक्य पवार - तामिळ थलाईव्हाज
  12. महेंद्र राजपूत - गुजरात जायंट्स
  13. सुशांत साईल - दबंग दिल्ली के. सी.
  14. रोहित बने - बंगाल वॉरियर्स
  15. आकाश पिकलमुंडे - बंगाल वॉरियर्स
  16. विशाल माने - बंगाल वॉरियर्स
  17. राजवीरसिंग चव्हाण - पाटना पायरट्स
  18. सुधाकर कदम - हरयाणा स्टीलर्स
  19. पंकज मोहिते - पुणेरी पलटन
  20. संकेत सावंत -  पुणेरी पलटन 
  21. बाळासाहेब जाधव - पुणेरी पलटन
  22.  आकाश अर्सुल - तेलुगू टायटन्स
  23. अजिंक्य कापरे - यू मुंबा


 

Web Title: Pro Kabaddi League 2021-22: Full Squad Details of All PKL Teams, know Maharashtra's 23 player's full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.