Pro Kabaddi League 2021-22: बंगळुरू, यू मुंबाचा धडाकेबाज विजय; अजीत कुमार, पवन कुमार ठरले हिरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 10:15 PM2021-12-30T22:15:00+5:302021-12-30T22:15:37+5:30

यू मुंबाने पहिल्या सामन्यात जयपूरला तर बंगळुरू बुल्सने दुसऱ्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सचा पराभव केला.

Pro Kabaddi League 2021-22 Live Updates U Mumba vs Jaipur Pink Panther Bengaluru Bulls vs Haryana Steelers | Pro Kabaddi League 2021-22: बंगळुरू, यू मुंबाचा धडाकेबाज विजय; अजीत कुमार, पवन कुमार ठरले हिरो

Pro Kabaddi League 2021-22: बंगळुरू, यू मुंबाचा धडाकेबाज विजय; अजीत कुमार, पवन कुमार ठरले हिरो

Next

Pro Kabaddi League 2021-22 Live Updates: प्रो कबड्डीच्या दुसऱ्या आठवड्यात यू मुंबाने हंगामातील दुसरा विजय मिळवला. जयपूर पिंक पँथर्सचा ३७-२८ असा सहज पराभव करून यू मुंबाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. तर बंगळुरू बुल्स संघाने दुसऱ्या सामन्यात हंगामातील तिसरा विजय मिळवला. हरयाणा स्टीलर्सना त्यांनी ४२-२८ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं.

अजित कुमार अन् अभिषेक सिंगने यू मुंबाला मिळवून दिला विजय (३७-२८)

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात यू मुंबाने आपला पहिला विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या विजयासाठी त्यांना खूप वाट पाहावी लागली. पण अखेर जयपूरविरूद्ध त्यांनी हा विजय मिळवला. स्टार रेडर अभिषेक सिंगने लौकिकाला साजेशी कामगिरी करत ९ रेड पॉईंट्ससह १० गुण मिळवले. त्या अजित कुमारकडून उत्तम साथ मिळाली. अजितने ९ रेड पॉईंट्ससह ११ गुण मिळवले. जयपूरच्य अर्जुन देशवालने लय कायम राखत ९ रेड पॉईंट्ससह १४ गुण मिळवले होते पण त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

पवन कुमारच्या धडाका अन् बंगळुरू बुल्सचा विजय (४२-२७)

बंगळुरू बुल्स संघाने आपली विजयी लय कायम राखत दमदार खेळ केला. त्यांनी हरयाणा स्टीलर्सना मोठ्या फरकाने पराभूत केले. बंगळुरूचा धडाकेबाज रेडर पवन कुमार याने आपल्या लौकिलाला साजेसा खेळ केला. त्याने १५ रेड पॉईंट्स, २ टॅकल पॉईंट्स आणि ५ बोनस गुणांसह तब्बल २२ गुण मिळवले. पवनने बंगळुरू संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

Web Title: Pro Kabaddi League 2021-22 Live Updates U Mumba vs Jaipur Pink Panther Bengaluru Bulls vs Haryana Steelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.