प्रो कबड्डी लीग सीझन १० साठी रिटेन्ड खेळाडूंची यादी जाहीर; पवन सेहरावत, विकास कंडोलावर लागणार बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:04 PM2023-08-07T16:04:23+5:302023-08-07T16:05:01+5:30
मुंबई : प्रो कबड्डी लीगने सोमवारी दहाव्या सीझनसाठी 'एलिट रिटेन्ड प्लेअर्स', 'रिटेन्ड यंग प्लेअर्स' आणि 'एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेयर्स'ची घोषणा केली.
मुंबई : प्रो कबड्डी लीगने सोमवारी दहाव्या सीझनसाठी 'एलिट रिटेन्ड प्लेअर्स', 'रिटेन्ड यंग प्लेअर्स' आणि 'एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेयर्स'ची घोषणा केली. एकूण ८४ खेळाडूंना ३ श्रेणींमध्ये कायम ठेवण्यात आले असून २२ एलिट रिटेन्ड प्लेअर्स (ERP) श्रेणीतील, २४ रिटेन्ड यंग प्लेअर्स (RYP) श्रेणीत आणि ३८ विद्यमान न्यू यंग प्लेयर्स (ENYP) श्रेणीत आहेत. रिटेन्ड न केलेल्या खेळाडूंमध्ये पवन सेहरावत आणि विकास कंडोला यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. मुंबईत ८ ते ९ सप्टेंबर दरम्यान PKL सीझन १० खेळाडूंचा लिलाव होईल.
संघांनी कायम ठेवलेल्या टॅलेंट पूलमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंमध्ये उत्तम संतुलन आहे. PKL दिग्गज प्रदीप नरवालला यूपी योद्धाने कायम ठेवले आहे. अस्लम मुस्तफा इनामदारला पुणेरी पलटणने कायम ठेवले आहे. सीझन ९ मधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अवॉर्ड विजेता अर्जुन देशवालला जयपूर पिंक पँथर्सने कायम ठेवले आहे.
𝗞𝗵𝗮𝗺𝗺𝗮 𝗚𝗵𝗮𝗻𝗶 from the men in 🩷
— ProKabaddi (@ProKabaddi) August 7, 2023
Will @JaipurPanthers' Elite Retained Players help defend the 🏆 this season?#ProKabaddi#JaipurPinkPanthers#PKLPlayerAuctionpic.twitter.com/0tG4Z6CNJW
एलिट रिटेन्ड खेळाडू
बंगळुरू बुल्स - नीरज नरवाल
गुजरात जायंट्स - मनुज, सोनू
हरयाणा स्टीलर्स - के. प्रपंजन
जयपूर पिंक पँथर्स - सुनील कुमार, अजिथ कुमार, रेझा मिर्बाघेरी, भवानी राजपूत, अर्जुन देश्वाल, साहुल कुमार
पाटणा पायरट्स - सचिन, नीरज कुमार
पुणेरी पलटन - अभिनेश, गौरव
तामिल थलायव्हाज - अजिंक्य पवार
तेलुगू टायटन्स - पर्वेष भैन्स्वाल
यू मुंबा - सुरींदर सिंग, जय भगवान, रिंकू, हैदराली एक्रामी
यूपी योद्धा - प्रदीप नरवाल, नितेश कुमार