Pro Kabaddi League : यू मुंबाने घडवला इतिहास, घरच्या मैदानावर 'हा' विक्रम नोंदवणारा पहिलाच संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 04:30 PM2018-11-17T16:30:41+5:302018-11-17T16:48:07+5:30

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात विक्रमांचे सत्र इंटर झोन चॅलेंजमध्येही सुरू आहे.

Pro Kabaddi League: U Mumba created history, the first team to record four straight win in interzone stage | Pro Kabaddi League : यू मुंबाने घडवला इतिहास, घरच्या मैदानावर 'हा' विक्रम नोंदवणारा पहिलाच संघ

Pro Kabaddi League : यू मुंबाने घडवला इतिहास, घरच्या मैदानावर 'हा' विक्रम नोंदवणारा पहिलाच संघ

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रो कबड्डीच्या इंटर झोन चॅलेंजमध्येही विक्रमांचे सत्र सुरू यू मुंबाने घरच्या प्रेक्षकांसमोर केली उल्लेखनीय कामगिरीतमीळ थलायव्हाजचा पराभव करून घेतला विजयी निरोप

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात विक्रमांचे सत्र इंटर झोन चॅलेंजमध्येही सुरू आहे. यू मुंबाने गुरुवारी घरच्या मैदानावर अखेरच्या लढतीत तमीळ थलायव्हाजवर एकहाती विजय मिळवला. घरच्या प्रेक्षकांसमोरील अखेरच्या सामन्यात यू मुंबाने 36-22 असा विजय मिळवताच ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. इंटर झोन चॅलेंजमध्ये घरच्या मैदानावर आत्तापर्यंत एकाही संघाला सलग चार सामने जिंकता आले नव्हते, परंतु यू मुंबाने हा पराक्रम करून दाखवला.



यू मुंबाने 'A' गटात 14 सामन्यांत 10 विजय मिळत 56 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. तमीळ थलायव्हाज संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी यजमानांनी हरयाणा स्टीलर्स, यूपी योद्धा आणि बेंगळुरु बुल्स या संघाना पराभूत केले होते. त्यामुळे थलायव्हाजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून ते विक्रम करतात का, याची उत्सुकता लागली होती. त्यांनी अगदी सहजतेने विजय मिळवून घरच्या प्रेक्षकांचा निरोप घेतला.


यू मुंबाच्या दर्शन कॅडियनने 6, सिद्धार्थ देसाई आणि विनोद कुमार यांनी प्रत्येकी 5 गुणांची कमाई केली. कर्णधार फझल अत्राचलीने पकडीत आपला दम दाखवला. त्याने या सत्रात पकडीच्या गुणांचे अर्धशतकही साजरे केले. पकडीच्या गुणांत तो (57) अग्रस्थानावर आहे. चढाईत सिद्धार्थने 131 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.

Web Title: Pro Kabaddi League: U Mumba created history, the first team to record four straight win in interzone stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.