प्रो कबड्डीनं सिद्धार्थ देसाईला बनवलं करोडपती, साकारणार आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:50 AM2019-04-09T09:50:44+5:302019-04-09T09:51:17+5:30

Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते...

Pro Kabaddi made Siddharth Desai a crorepotapati, now he fulfill Mother's dream of 'Four Wheeler'! | प्रो कबड्डीनं सिद्धार्थ देसाईला बनवलं करोडपती, साकारणार आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न!

प्रो कबड्डीनं सिद्धार्थ देसाईला बनवलं करोडपती, साकारणार आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न!

googlenewsNext

स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात असाच एक निर्धाराने पक्का असलेला शेतकऱ्याचा मुलगा सर्वांचे लक्ष वेधून गेला. अनुप कुमारच्या नसण्याने यू मुंबा संघात निर्माण झालेली पोकळी महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई भरून काढली. लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थने सर्वाधिक 221 गुणांची कमाई केली. प्रो कबड्डीच्या सहाव्या सत्रात सिद्धार्थ पोस्टर बॉय म्हणून समोर आला. याच सिद्धार्थला सातव्या मोसमासाठी तेलगु टायटन्सने 1.45 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. कामगिरीत सातत्य राखून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा त्याचा निर्धार आहे. 

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरच्या सिद्धार्थला यू मुंबाने आपल्या चमूत दाखल करून घेतले होते. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सिद्धार्थने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. यू मुंबाने 34 लाखांची बोली लावत सिद्धार्थला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आणि कामगिरीच्या जोरावर त्याने आपली निवड सार्थ ठरवली होती. आता तो तेलगु टायटन्सकडून खेळणार आहे. 


आई-वडील, एक भाऊ अशा छोट्याश्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थने स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. वडील शेतकरी आणि आई गृहीणी, त्यामुळे आर्थिक चणचण ही भासायची, परंतु त्याची सबब पुढे न करता सिद्धार्थ स्वप्नांच्या दिशेने चालत राहिला. सातव्या वर्षांपासून त्याने गावातच कबड्डीचे धडे गिरवले. पण, त्याला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज होती. 'फिजिक्स बीएससी' चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुण्यातील सत्तेज बाणेर क्लबकडून खेळू लागला आणि तिथून त्याच्या व्यावसायिक कबड्डीला सुरूवात झाली. 


दोन वर्षांनंतर त्याला एअर इंडियावर काँट्रॅक्टवर नोकरी मिळाली. येथेच त्याची कबड्डी बहरली. तो म्हणाला,''एअर इंडियाकडून खेळताना माझ्या खेळात बरीच सुधारणा झाली. या क्लबकडून खेळताना अनुभवी खेळाडूंकडून बरेच काही शिकायला मिळाले. प्रशिक्षक अशोक शिंदे यांची मला खूप मदत झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळात बरीच सुधारणा झाली. दोन वर्ष मी एअर इंडियाकडून खेळत आहे.''

प्रो कबड्डीच्या लिलावातून मिळालेल्या रकमेचं काय करणार या प्रश्नावर तो सुरुवातीला हसला आणि म्हणाला,''खूप काही करायचं आहे. घर घ्यायचं आहे, आई-वडिलांसाठी भावासाठी खूप काही घ्यायचं आहे. कारण, उभ्या आयुष्यात इतकी रक्कम मी कधी पाहिली नव्हती. पण, सर्वप्रथम मला माझ्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे. ती म्हणजे फोर व्हीलर घेण्याची. त्यामुळे या पैशांनी प्रथम फोर व्हीलर खरेदी करून आईला त्यात बसवून फेरफटका मारून आणायचे आहे.''

Web Title: Pro Kabaddi made Siddharth Desai a crorepotapati, now he fulfill Mother's dream of 'Four Wheeler'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.