समस्यांचा फ्रेंचायसींना फटका : प्रीती झिंटा
By admin | Published: April 21, 2016 04:16 AM2016-04-21T04:16:40+5:302016-04-21T04:16:40+5:30
दर वर्षी आयपीएलमधील समस्या वाढत आहेत. याचा थेट फटका सहभागी फ्रेंचायसींना बसत असल्याची तक्रार किंग्स इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने केली आहे.
नवी दिल्ली : दर वर्षी आयपीएलमधील समस्या वाढत आहेत. याचा थेट फटका सहभागी फ्रेंचायसींना बसत असल्याची तक्रार किंग्स इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने केली आहे. या लोकप्रिय लीगचा ब्रॅन्ड आणि यातील कमाईमुळे ही स्पर्धा तपास यंत्रणेचे ‘टार्गेट’ बनत चालल्याचे मत प्रीतीने व्यक्त केले.
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे आयपीएलचे १३ सामने राज्याबाहेर हलविण्यात आले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रीती म्हणाली, ‘‘यामुळे ब्रॅन्डवर विपरीत परिणाम झाला आहे. संघ मालकांसाठी हा तोट्याचा सौदा आहे. दर वर्षी कुठला तरी वाद किंवा अफवा पसरत असल्याने आयपीएल आता टार्गेट होत असल्याचे माझे मत आहे.’’ २०१३ मध्ये आयपीएलला ‘स्पॉट फिक्सिंग’चा सामना करावा लागला. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे या स्पर्धेचा पहिला टप्पा सौदी अरब अमिरातमध्ये स्थानांतरित करण्यात आला.न्यायपालिकेवर माझा १०० टक्के विश्वास आहे. पण मी जनहित याचिका दाखल करणाऱ्यांना विचारते, की दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील समस्या सोडविण्यासाठी आपण काय केले? राज्यातील वृद्धांच्या समस्या सोडविण्यासाठी मी खूप काम केले आहे. समाजाप्रती माझी जबाबदारी स्वीकारून मी ही मोहीम राबविली. किंग्स पंजाबची मालकीण किंवा चित्रपट अभिनेत्री या नात्याने मी फॅशन म्हणून काम केले नाही, हे स्पष्ट करू इच्छिते.
- प्रीती झिंटा