आॅलिम्पिकमध्ये व्यावसायिक बॉक्सिंगला लवकरच परवानगी

By admin | Published: November 2, 2015 12:14 AM2015-11-02T00:14:54+5:302015-11-02T00:14:54+5:30

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) लवकरच व्यावसायिक बॉक्सिंगला आॅलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी देईल,

Professional boxing will soon be allowed at the Olympics | आॅलिम्पिकमध्ये व्यावसायिक बॉक्सिंगला लवकरच परवानगी

आॅलिम्पिकमध्ये व्यावसायिक बॉक्सिंगला लवकरच परवानगी

Next

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) लवकरच व्यावसायिक बॉक्सिंगला आॅलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी देईल, असा दावा ब्रिटनचा व्यावसायिक बॉक्सर आमीर खान याने केला आहे. सद्यस्थितीत एआयबीए पुरस्कृत वर्ल्ड बॉक्सिंग सीरिज आणि एआयबीए व्यावसायिक लीगमध्ये भाग घेणारे खेळाडू सोडून इतरांना आॅलिम्पिकसह इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्यास परवानगी मिळत नाही.
व्यावसायिक खेळाडू बनण्याअगोदर २00४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये १७ व्या वर्षी पदक जिंकणाऱ्या आमीर खानने खुलासा केला आहे, की, एआयबीए स्पर्धेमध्ये व्यावसायिक बॉक्सर्सना आणण्यासाठी नियमात बदल होणे निश्चित आहे. व्यावसायिक खेळाडू खूप काळापासून याची मागणी करीत आहेत. आमीर खानने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, एआयबीए अध्यक्ष चिंग कू वु माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या निमंत्रणावरुन दोहा येथील स्पर्धेनिमित्त मी गेलो होतो. वु यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला कळले की, ते लवकरच नियमांत बदल करणार आहेत.(वृत्तसंस्था)

Web Title: Professional boxing will soon be allowed at the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.