वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम जाहीर

By admin | Published: August 15, 2014 12:27 AM2014-08-15T00:27:16+5:302014-08-15T00:27:16+5:30

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद कोच्चीला सोपविण्यात आले

The program for the series against the West Indies is announced | वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम जाहीर

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम जाहीर

Next

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद कोच्चीला सोपविण्यात आले असून, ३० आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी हैदराबादमध्ये रंगणार आहे. वन-डे मालिकेला ८ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.
दौऱ्याचा प्रारंभ ८ आॅक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या वन-डेने होणार आहे. दुसरा वन-डे ११ आॅक्टोबरला विशाखापट्टणममध्ये खेळल्या जाणार आहे. कटक व कोलकाता येथे अनुक्रमे तिसरा व चौथा वन-डे १४ व १७ आॅक्टोबरला खेळला जाईल. मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना २० आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे होईल. एकमेव टी-२० सामना नवी दिल्ली येथे २२ आॅक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. धर्मशाला येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीचा अपवाद वगळता, मर्यादित षटकांचे उर्वरित सामने दिवस/रात्र खेळले जाण्याची शक्यता आहे. वन-डे मालिका व टी-२० सामन्यानंतर ३० आॅक्टोबरपासून हैदराबाद येथे कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दुसरा कसोटी सामना ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत बेंगळुरूमध्ये तर तिसरा व शेवटचा कसोटी सामना १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबाद येथे रंगणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The program for the series against the West Indies is announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.