रेल्वेतील महिला क्रिकेटपटूंना पदोन्नती : प्रभू यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:23 AM2017-07-24T01:23:26+5:302017-07-24T01:23:26+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज भारतीय महिला वर्ल्डकप संघातील जे खेळाडू रेल्वेत आहेत अशांसाठी पदोन्नतीची घोषणा केली
नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज भारतीय महिला वर्ल्डकप संघातील जे खेळाडू रेल्वेत आहेत अशांसाठी पदोन्नतीची घोषणा केली आहे. भारतीय संघातील १५ खेळाडूंपैकी १0 क्रिकेटपटू रेल्वेत आहेत. त्यात कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांचादेखील समावेश आहे.
वेळेआधी पदोन्नती देण्याशिवाय या क्रिकेटपटूंना रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत. रेल्वे क्रीडा प्रमोशन बोर्डाच्या सचिव रेखा यादव म्हणाल्या, ‘‘रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय संघाला शुभेच्छा पाठवल्या आहेत. त्यांनी रेल्वेत असणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना पदोन्नती देण्याची घोषणा केली आहे. त्यांना
रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत.’’
मिताली राज आणि हरमनप्रीत यांच्यासह रेल्वेत असणाऱ्या एकता बिष्ट, पूनम राऊत, वेदा कृष्णमूर्ती, पूनम यादव, सुषमा वर्मा, मोना मेश्राम, राजेश्वरी गायकवाड आणि नुजहत परवीन या भारतीय संघात आहेत.