..अन् सचिनचे भाकीत खरे ठरले

By admin | Published: July 22, 2014 02:12 AM2014-07-22T02:12:42+5:302014-07-22T02:12:42+5:30

‘लॉर्ड्स’वरील सामन्यात ‘भारत जिंकणारच’ हे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने वर्तविलेले भाकीत खरे ठरले.

..the prophecy of Sachin is true | ..अन् सचिनचे भाकीत खरे ठरले

..अन् सचिनचे भाकीत खरे ठरले

Next
विनय नायडू  - मुंबई  
‘लॉर्ड्स’वरील सामन्यात ‘भारत जिंकणारच’ हे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने वर्तविलेले भाकीत खरे ठरले. मी अजरुनला म्हणालो होतो, भारत ही कसोटी जिंकणारच आणि झालेही तसेच. आपण जिंकलो.. लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर खास ‘लोकमत’शी बोलताना सचिनच्या प्रत्येक शब्दांतून आनंद ओसंडून वाहत होता. 
लंडनहून परतल्यानंतर सचिनने वांद्रय़ातील पेरी क्रॉस रोडवरील आपल्या घरात मुलगा अजरुनसोबत टी.व्ही.वर संपूर्ण सामना पाहिला. तो म्हणाला, ‘पहिल्या दिवसाचे पहिले सत्र भारताने गाजविले, तेव्हाच मी अजरुनला भारत हा सामना जिंकणार, असे सांगितले होते. माङो म्हणणो खरे ठरले. भारताने लॉर्ड्सवर मिळविलेल्या विजयाने मी खूप उत्साहित आणि आनंदित झालो आहे. आपल्या सर्वासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. अजूनही मी जल्लोष करीत आहे, असेही सचिन या वेळी म्हणाला. धोनीसेनेने क्रिकेट पंढरी लॉर्ड्सवर इंग्लंडला 28 वर्षानंतर हरविले. या विजयाने प्रत्येक भारतीयाला जसा आनंद झाला तसाच सचिनही हरखून गेला. तो म्हणाला, भारतीय संघाने जो विजय मिळविला, त्याचा मला अभिमान आहे. पुढेही संघ अशीच कामगिरी करेल, अशी आशाही सचिनने व्यक्त केली.

 

Web Title: ..the prophecy of Sachin is true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.