‘पुरस्कारासाठी योग्यता सिद्ध करा’

By Admin | Published: January 13, 2015 02:17 AM2015-01-13T02:17:35+5:302015-01-13T02:17:35+5:30

खेळाडूंनी स्वत:ची कामगिरी उंचावून पुरस्कार मिळविण्याची योग्यता सिद्ध करावी; शासकीय पुरस्कार मागत फिरू नये,

'Prove eligibility for awards' | ‘पुरस्कारासाठी योग्यता सिद्ध करा’

‘पुरस्कारासाठी योग्यता सिद्ध करा’

googlenewsNext

कोलकाता : खेळाडूंनी स्वत:ची कामगिरी उंचावून पुरस्कार मिळविण्याची योग्यता सिद्ध करावी; शासकीय पुरस्कार मागत फिरू नये, या शब्दांत जागतिक बिलियडर्सचा विश्वविजेता पंकज अडवाणी याने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
दहा वेळचा विश्व स्रूकर आणि बिलियार्ड्स विजेता असलेल्या पंकजने राष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्रूकर स्पर्धेच्या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की मी कधीही पुरस्काराची मागणी केली नाही किंवा त्यासाठी भांडत बसलो नाही. अशा प्रकाराचे पुरस्कार मिळविण्यासाठी स्वत:ची योग्यता सिद्ध करायची असते. देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी माझ्या नावाचीदेखील शिफारस झालेली आहे. या पुरस्काराचा मानकरी असल्याची सरकारला खात्री पटेल, तेव्हा निश्चित प्रक्रियेअंतर्गत पुरस्कार देणे हे त्यांचे काम असल्याचे शेवटी पंकज म्हणाला.(वृत्तसंस्था)

Web Title: 'Prove eligibility for awards'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.