मानसशास्त्रज्ञ वाढवणार खेळाडूंचे मनोबळ - अनुराग सिंह ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:57 AM2021-08-11T08:57:54+5:302021-08-11T08:58:07+5:30

खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना ठाकूर म्हणाले, खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेली कॉन्फरन्सिंग द्वारे ते समुपदेशन करतात.

Psychologists will boost the morale of the players - Anurag Singh Thakur | मानसशास्त्रज्ञ वाढवणार खेळाडूंचे मनोबळ - अनुराग सिंह ठाकूर

मानसशास्त्रज्ञ वाढवणार खेळाडूंचे मनोबळ - अनुराग सिंह ठाकूर

googlenewsNext

- विकास झाडे

नवी दिल्ली : कोरोना काळात खेळाडूंचे मनोबळ खचू नये, त्यांना निराशा येऊ नये यासाठी केंद्र सरकारने विशेष उपक्रम सुरु केला आहे. खेळाडूंसाठी विशेष मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली.

खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना ठाकूर म्हणाले, खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेली कॉन्फरन्सिंग द्वारे ते समुपदेशन करतात. शिवाय खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ऑलम्पिक आशिया क्रीडा स्पर्धा, राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धा अशा महत्वपूर्ण सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना विशेष आर्थिक निधी प्रदान केला जातो. जे पदक विजेत्या खास खेळाडूंनी वयाच्या ३० व्या वषार्नंतर खेळातून निवृत्त झाले असतील अशा खेळाडूंसाठी १२ ते २० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन दिले जाते. प्रासंगिक आणि विविध खर्चाची पूर्तता करण्यासाठी, निवडलेल्या खेळाडूंना कोअर ग्रुपमध्ये दरमहा ५० हजार रुपये दिले जातात. विकास गटात दरमहा २५ हजार भत्ता दिला जातो.

  शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, 'खेलो इंडिया नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' नावाची एक केंद्रीय क्षेत्र योजना चालवते, ज्यामध्ये ग्रामीण आणि स्वदेशी, आदिवासी खेळांना प्रोत्साहन दिले जाते. याकडेही ठाकूर यांनी लक्ष वेधले.

क्रीडा कोट्यातून नोकऱ्यांची माहिती केंद्राकडे नाही!
 क्रीडा कोटा धोरणातंर्गत गुणवंत खेळाडूंसाठी गट आणि पूर्वीचे गट 'घ' मध्ये थेट भरतीच्या रिक्त पदांच्या ५ टक्केपर्यंत आरक्षण प्रदान करते, तथापि, क्रीडा कोटा अंतर्गत प्रदान केलेल्या नोकऱ्यांची आकडेवारी केंद्रीकृत रुपात देखभाल केली जात नाही, अशी माहिती अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली.

ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन!
ऑलिम्पिक आणि एशियन गेम्स खेलो इंडिया स्कीम आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील ग्रामीण भागातील खेळाडू आणि संघांची प्रतिभा ओळखणे आणि त्यांचे संगोपन करणे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, एसएआय प्रशिक्षण केंद्र (एसटीसी), एसटीसीचे विस्तारक केंद्र आणि राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा स्पर्धा या योजनेंतर्गत केले जात असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. 

Web Title: Psychologists will boost the morale of the players - Anurag Singh Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.