हा तर द्रविड आणि झहीरचा सार्वजनिक अपमान - रामचंद्र गुहा

By admin | Published: July 16, 2017 05:14 PM2017-07-16T17:14:52+5:302017-07-16T17:16:06+5:30

द्रविड आणि झहीरच्या नियुक्तीस स्थगिती देण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दोन्ही माजी क्रिकेटपटूंचा झालेला सार्वजनिक अपमान असल्याची टीका

This is public humiliation of Dravid and Zaheer - Ramchandra Guha | हा तर द्रविड आणि झहीरचा सार्वजनिक अपमान - रामचंद्र गुहा

हा तर द्रविड आणि झहीरचा सार्वजनिक अपमान - रामचंद्र गुहा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - मुख्य प्रशिक्षक आणि सल्लागारांच्या नियुक्तीवरून भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सुरू झालेला विवाद दर दिवशी नवनवी वळणे घेत आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या सल्लागारपदी झालेल्या नियुक्तीवरून वाद होऊन त्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दोन्ही माजी क्रिकेटपटूंचा झालेला सार्वजनिक अपमान असल्याची टीका बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे माजी सदस्य आणि विचारवंत रामचंद्र गुहा यांनी केली आहेत. 
बीसीसीआयमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत रामचंद्र गुहा यांनी ट्विटरवरून परखड भाष्य केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात."सुरुवातीला अनिल कुंबळेचा अपमान करण्यात आला. आता झहीर खान आणि राहुल द्रविड यांना अपमानिक करण्यात आले. कुंबळे, द्रविड आणि झहीर हे क्रिकेटचे दूत आहेत आणि त्यांच्यासोबत असे वर्तन होता कामा नये होते." 
रवी शास्त्रीला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर आणि राहुल द्रविड व झहीर खानच्या नियुक्तीला बीसीसीआयकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर गुहा यांनी ही टिप्पणी केली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीत गुहा यांचा समावेश होता. मात्र काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार कल्चरवर टीका करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
अधिक वाचा
(झहीर आणि राहुल द्रविडचा फैसला होणार 22 जुलैला )
(शास्त्री यांच्या वेतन निश्चितीसाठी समिती )
राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही )
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नियुक्तीला लाल कंदिल दाखवत, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट तूर्तास बासनात गुंडाळून ठेवले होते. सल्लागर समितीकडून सपोर्ट स्टाफमध्ये राहुल आणि झहीरची नावे सुचवण्यात आली आहेत, पण मुख्य प्रशिक्षिक रवी शास्त्री यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे क्रिकेट प्रशासकांच्या समितीने स्पष्ट केले. येत्या 22 जुलैला झहीर आणि राहुल द्रविड संबंधी अंतिम निर्णय होईल. 

Web Title: This is public humiliation of Dravid and Zaheer - Ramchandra Guha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.