खरी 'फायटर'! भारताच्या लेकीनं रचला इतिहास; देश गाढ झोपेत असताना गाठले यशाचे शिखर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 07:51 AM2024-06-09T07:51:59+5:302024-06-09T08:04:32+5:30
Puja Tomar vs Dos Santos : पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.
Puja Tomar UFC Record : संपूर्ण देश गाढ झोपेत असताना भारताच्या लेकीने ऐतिहासिक कामगिरी केली. मूळची उत्तर प्रदेशातील असलेली पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे. कधीकाळी लहान कपडे घातल्यामुळे समाजाचे टोमणे ऐकलेल्या पूजाने तिच्या या यशाने सर्वांना प्रत्युत्तर दिले. अनेकदा तिने तिचा संघर्ष मांडताना या बाबी सांगितल्या आहेत. भारताची पहिली महिला MMA फायटर पूजा तोमरने इतिहास रचला. सायक्लोन म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या भारताच्या पूजाने ब्राझीलच्या खेळाडूचा पराभव केला. (Puja Tomar Creates History)
क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करताना पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली. तिने केंटकी येथील UFC कॅनोनियर-इमावोव्ह येथे महिलांच्या स्ट्रॉवेट विभागात ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला. तिने ९ जून रोजी यूएफसीमध्ये पदार्पण केले.
These two are BRINGING it for the first fight of #UFCLouisville 🔥
— UFC (@ufc) June 8, 2024
[ Live NOW on @ESPNPlus ] pic.twitter.com/sUQarK3Lke
दरम्यान, पूजा तोमरने ऑक्टोबर २०२३ मध्ये UFC सोबत तिच्या करारावर स्वाक्षरी केली होती. केंटकी येथे झालेल्या लढतीत तिने ब्राझीलच्या खेळाडूला पराभवाची धूळ चारली. पूजाच्या आधी अंशुल जुबली आणि भरत कंडारे यांनी UFC मध्ये जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, कोणालाच जेतेपद जिंकता आले नव्हते. मात्र, पूजाने ऐतिहासिक यश मिळवले आणि UFC मध्ये बाउट जिंकण्याचा मान पटकावला.
पूजा तोमर कोण आहे?
जागतिक पातळीवर भारताचा डंका वाजवणारी पूजा तोमर ही मूळची उत्तर प्रदेशातील आहे. ती आतापर्यंत पाचवेळा राष्ट्रीय वुशू चॅम्पियन राहिली आहे. पूजाने २०१२ पासून MMA फायटिंगला सुरुवात केली आणि यशाचे शिखर गाठले. २०२२ मध्ये MFN स्ट्रॉवेट जेतेपद जिंकण्यापूर्वी तिने सलग चार विजय मिळवण्याची किमया साधली. ग्रामीण भागातून आलेल्या पूजाला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शॉर्ट्स कपडे परिधान केल्यामुळे अनेकांनी तिला टोमणे मारले. पण, आता तिने टीकाकारांना तिच्या यशाने उत्तर दिले आहे.