पुजारामुळे काम सोपे - विजय

By admin | Published: March 19, 2017 02:16 AM2017-03-19T02:16:44+5:302017-03-19T02:16:44+5:30

दडपण झुगारण्याच्या चेतेश्वर पुजाराच्या क्षमतेमुळे अन्य फलंदाजांना नैसर्गिक खेळ करणे सोपे होते, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने व्यक्त केली.

Pujara easy to work - Vijay | पुजारामुळे काम सोपे - विजय

पुजारामुळे काम सोपे - विजय

Next

रांची : दडपण झुगारण्याच्या चेतेश्वर पुजाराच्या क्षमतेमुळे अन्य फलंदाजांना नैसर्गिक खेळ करणे सोपे होते, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने व्यक्त केली.
पुजाराने आज दिवसभर फलंदाजी करताना नाबाद १३० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला दिवसअखेर ६ बाद ३६० धावांची मजल मारता आली.
पुजाराची प्रशंसा करताना विजय म्हणाला,‘पुजाराला दडपणाखाली चांगली कामगिरी करण्याची सवय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवता येतो. त्यामुळे आपल्याला नैसर्गिक खेळ करता येतो. आम्ही दोघेही फॉर्मात असल्यामुळे संघाला मदत झाली.’
विजय व पुजारा यांनी पहिल्या सत्रात दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली.
विजय पुढे म्हणाला,‘या लढतीत उभय संघ सध्या बरोबरीत आहेत. आम्ही लक्ष्यासमीप पोहोचलो किंवा आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरलो तर लढत रंगतदार होईल.
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी आज अचूक मारा केली. मी पुजारासोबत याबाबत चर्चाही
केली.’
विजय म्हणाला, ‘आम्ही जर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरलो तर दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात चांगल्या धावा फटकावता येतील, असे आमचे मत होते. जर मी बाद झालो नसतो तर आमची स्थिती यापेक्षा चांगली असती.’
कमिन्सबाबत बोलताना विजय म्हणाला, ‘कमिन्सने आज सुरुवातीपासून चांगला मारा केली. सुरुवातीचा त्याचा स्पेल भेदक होता. तो एकाच टप्प्यावर मारा करीत होता. विकेट गेल्यानंतर त्याच्यात उत्साह संचारला.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Pujara easy to work - Vijay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.