भारताला पुजाराचा सहारा, अजूनही 91 धावांची पिछाडी
By admin | Published: March 18, 2017 05:51 PM2017-03-18T17:51:16+5:302017-03-18T17:51:16+5:30
चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या नाबाद शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 18 - चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या नाबाद शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. तिस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा विकेट्स गमावत 360 धावा केल्या आहेत. पुजाराव्यतिरिक्त लोकेश राहुल (67) आणि मुरली विजय (82) यांनी अर्धशतक केलं. ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेला युवा गोलंदाज कमिंस कंगारु सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. विराट कोहलीसोबत चार विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डाव्यातील 451 धावांच्या तुलनेत भारत अजूनही 91 धावांनी पिछाडीवर आहे. पुजारासोबत विकेटकीपर रिद्धिमान साहा 18 धावांसह मैदानावर आहे. तिस-या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने सर्वात अगोदर मुरली विजयची विकेट गमावली. त्यानंतर अजिंक्य रहाणे (14) आणि विराट कोहलीच्या (6) रुपाने दोन महत्वाचे गडी बाद झाल्याने मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाचा झटका बसला. ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या शेवट्या सत्रात नायर (23) आणि अश्विन (3) यांची विकेट घेत भारताला अजून दोन झटके दिले. भारताने जेव्हा आपला सहावा गडी गमावला तेव्हा भारत 123 धावांनी पिछाडीवर होता. दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताचा खेळ मंदावला. अंतिम सत्रात भारताने फक्त 57 धावा केल्या. पुजारा मैदानावर अजून खेळत असल्याने भारताच्या आशा कायम आहेत.
याअगोदर भारताने लंचपर्यंत दोन विकेट गमावत 193 धावा केल्या होत्या. दुस-या सत्रात 110 धावा केल्या होत्या. लंचनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून खूप सा-या अपेक्षा होत्या. क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने विराटने मैदान सोडलं होतं. मात्र विराट कोहली अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही आणि स्वस्तात बाद झाला.
अजिंक्य रहाणेने सुरुवात केली तेव्हा लय सापडल्याचं दिसत होतं. मात्र बाऊन्स न समजल्याने मॅथ्यू वेडच्या हाती त्याची विकेट गेली. पुजाराने केलेलं शकत या मालिकेतील भारतीय फलंदाजाचं पहिलं शतक ठरलं आहे.