पुण्याचा मुंबईवर 7 विकेट्सनी विजय
By admin | Published: April 6, 2017 11:42 PM2017-04-06T23:42:04+5:302017-04-07T00:10:51+5:30
मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंट्सने 7 विकेट्सनी विजय मिळवला.
Next
>
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 06 - मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंट्सने 7 विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना स्टीव्हन स्मिथच्या शानदार खेळीच्या जोरावर रायजिंग पुणे सुपरजायंट्सने 19.5 षटकात तीन बाद 187 धावा केल्या.
अजिंक्य रहाणे आणि स्टीव्हन स्मिथ यांनी धडाकेबाज खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोठी भर केली. स्टीव्हन स्मिथने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा केल्या. स्मिथने नाबाद 54 चेंडूत 84 धावा केल्या.तर अजिंक्य रहाणे 60 धावा कुटल्या. त्याला सौथीने झेलबाद केले. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीने नाबाद 12 धावा केल्या. तर मयांक अग्रवाल 6 आणि बेन स्टोक्स 21 धावा काढून तंबूत परतला.
याआधी मुंबई इंडियन्सने 20 षटकात 8 बाद 184 धावा केल्या होत्या. यामध्ये फलंदाज जोस बटलर याने सर्वाधिक जास्त धावा केल्या. बटलरने 19 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार लगावत 38 धावा केल्या. तर, नितीश राणाने 28 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार अशी खेळी करत 34 धावा केल्या. नितीश राणाला गोलंदाज अॅडम झाम्पा याने बाद केले. तर, जोस बटलरला इमरान ताहीरने पायचीत केले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला जास्त धावांची खेळी करता आली नाही. तो अवघ्या तीन धावा काढून तंबूत परतला. शेवटच्या फळीत संघाला सावरत हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली. त्याने नाबाद 15 चेंडूत चार षटकार आणि एक चौकार लगावत 35 धावांची खेळी केली. तर पार्थिव पटेल 19, अंबाती रायडू 10, कृणाल पांड्या 3, पोलार्ड 27 आणि टीम सौथीने 7 धावा केल्या.
रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून गोलंदाज इमरान ताहीरने सर्वाधिक तीन बळी टिपले. तर रजत भाटीयाने दोन आणि अॅडम झाम्पा व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.