पुण्याचे गुजरातला १९६ धावांचे आव्हान

By Admin | Published: April 29, 2016 09:35 PM2016-04-29T21:35:48+5:302016-04-29T21:35:48+5:30

आयपीएलच्या नवव्या पर्वात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने गुजरात लायन्सला १९६ धावांचे आव्हान दिले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर

Pune, chasing 196 runs in Pune | पुण्याचे गुजरातला १९६ धावांचे आव्हान

पुण्याचे गुजरातला १९६ धावांचे आव्हान

googlenewsNext
>
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २९ - आयपीएलच्या नवव्या पर्वात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने गुजरात लायन्सला १९६ धावांचे आव्हान दिले आहे. 
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने २० षटकात तीन बाद १९५ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ५४ चेंडूत पाच षटकार आणि आठ चौकारांची तूफान फटकेबाजी करत १०१ धावांची मजल मारली. अजिंक्य रहाणेने ४५ चेंडूत ५३ धावा कुटल्या. रहाणेला गोलंदाज ड्वेन ब्राव्होने धावबाद केले. तर सुरुवातीलाच, सौरभ तिवारी अवघ्या एका धावेवर सुरेश रैनाने धावबाद करुन तंबूत परत पाठविले. स्टीव्ह स्मिथला ड्वेन ब्राव्होने बाद केले, तर कप्तान महेंद्रसिंग धोनीने नाबाद ३० धावा आणि परेराने नाबाद तीन धावा केल्या. 
आयपीएलच्या स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर सलग चार सामन्यांत रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने विजय मिळविला असला तरी आव्हान कायम राखण्यासाठी पुढील सामन्यात विजय मिळविणे आवश्यक आहे.
गुजरात लायन्स संघाने या पर्वात चांगली कामगिरी केली असून, त्यांच्या नावावर सहा सामन्यांत ५ विजय आहेत. केवळ सनरायजर्स संघाविरुद्ध त्यांचा पराभव झाला आहे. गुजरात लायन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला राजकोट येथील सामन्यात ७ गडी राखून मात दिली होती. या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडे आहे
 

Web Title: Pune, chasing 196 runs in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.