'बाहा' निकालात पुण्याचा बोलबाला, सीओइपीचा सलग तिसऱ्यांदा विजय
By admin | Published: February 19, 2017 07:51 PM2017-02-19T19:51:48+5:302017-02-19T19:51:48+5:30
तीव्र चढ आणि उतार, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणेच्या संघाने विजेतेपद पटकावले.
Next
>ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. – तीव्र चढ आणि उतार, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणेच्या संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम निकालात पुण्याच्या नवले अभियांत्रिकी, सिंहगड अभियांत्रिकी, अल्हाट महाविद्यालय आणि सीओइपीचाच बोलबाला राहिला. जवळपास प्रत्येक विभागात पुण्याच्या महाविद्यालयांनी विजय मिळवला. अंतिम निकालात सर्वोत्तम संघाचे पारितोषिक सीओइपी पुणे, द्वितीय पारितोषिक आल्हाट अभियांत्रिकी पुणे, तिसरे सस्थान जालंधररच्या बी.आर.आंबेडकर नॅशनल इनि्स्टीटट्युट ऑफ टेक्नॉलॉजीने पटकावले. तर इ बाहात पहिले स्थान पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकीने तर दुसरे स्थान बी.व्ही. कॉलेज ऑफफ इनि्ससटीट्युटने पटकावले. या स्पर्धेत एम बाहा या गटात १५० महाविद्यालयांच्या संघांनी नोंदणी केली होती.
अतिशय खडतर असलेल्या या स्पर्धेत अनेक संघ स्पर्धाच पूर्ण करू शकलेच नाही. महिंद्रा अॅण्ड महिंदरा, एसएई इंडियाने आयोजित केलेल्या बाहा २०१७ या एटीव्ही रेसचा समारोप पिथमपूर येथील नॅटरॅक्स येथे करण्यात आला. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन महिंद्रा अॅण्ड महिद्राचे एम.डी. पवन गोयंका यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एआरआयचे डॉ.के.सी.वोरा, नॅटट्रीपचे सीईओ संजय बंदोपाध्याय, बाहा एसईइंडियाचे सुबोध मोर्ये, डॉ.इवान जोस उपिस्थत होते. या स्पर्धेची सुरूवात १५ रोजी करण्यात आली होती. तांत्रिक चाचण्यांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी एड्युरन्स टेस्ट घेण्यात आली. या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाच्या संघाला सलग चार तास आपली एटीव्ही (all terrian vehicle) चालवयाची होती. खडकाळ रस्ता, चिखल, पाणी, तीऱव चढ उतार याचा सामना करत या संघांनी आपल्या गाड्या मजबूत असल्याची चाचणी दिली. त्यातून तांत्रिक बाबींतून सीओइपीच्या संघाला विजेता घोषित करण्यात आले.