पुणेकरांनी दिला यजमानांना धक्का

By Admin | Published: February 22, 2016 03:46 AM2016-02-22T03:46:49+5:302016-02-22T03:46:49+5:30

जयपूर पिंक पँथर्सला घरच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या जोरदार पाठिंब्याचे कोणतेही दडपण न घेता पुणेरी पलटनने सलग दुसरा विजय मिळवताना यजमानांचा ३३-१८ असा धुव्वा उडवला.

Puneites gave the hosts a push | पुणेकरांनी दिला यजमानांना धक्का

पुणेकरांनी दिला यजमानांना धक्का

googlenewsNext

- रोहित नाईक,  जयपूर
जयपूर पिंक पँथर्सला घरच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या जोरदार पाठिंब्याचे कोणतेही दडपण न घेता पुणेरी पलटनने सलग दुसरा विजय मिळवताना यजमानांचा ३३-१८ असा धुव्वा उडवला. सुरजितने केलेल्या दमदार पकडी आणि कर्णधार मनजित चिल्लरचा आक्रमक खेळ या जोरावर पुणेकरांनी दमदार विजयाची नोंद करताना गुणतक्त्यात ३२ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत पुणेकरांनी संपूर्ण सामन्यात वर्चस्व मिळवले. घरच्या प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा आणि संघमालक अभिषेककडून मिळणारे प्रोत्साहन या जोरावर जयपूर बाजी मारणार, अशी आशा होती. मात्र, पुणेकरांनी शांतपणे खेळ करताना जयपूरला नमवले. मनजित, दीपक हुडा आणि अजय ठाकूर यांनी निर्णायक चढाया करताना जयपूरचे संरक्षण भेदले. तर, दुसऱ्या बाजूला सुरजितने जबरदस्त पकडी करताना यजमानांच्या आक्रमकांवर दबाव आणला.
१७व्या मिनिटाला जयपूरवर पहिला लोण चढवल्याचा फायदा घेत मध्यंतराला पुणेकरांनी १६-८ अशी मोठी आघाडी घेतली. यानंतर जयपूर प्रतिकार करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचे सर्वच प्रमुख खेळाडू निष्प्रभ ठरले. जसवीर सिंग आणि राजेश नरवाल यांना आक्रमणात फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच, यजमानांच्या बचावफळीनेही निराशा केली.
तत्पूर्वी झालेल्या एकतर्फी सामन्यात तेलगू टायटन्सने दणदणीत विजय मिळवताना बंगळुरू बुल्सचा ४०-२२ असा फडशा पाडला. पहिल्या डावातील आक्रमक खेळ अखेरपर्यंत कायम राखताना तेलगूने सहज बाजी मारली. आक्रमण आणि बचाव यांचा योग्य ताळमेळ साधताना तेलगूने संपूर्ण सामन्यात वर्चस्व मिळवले. राहुल कुमार, मनोज कुमार आणि मिराज शेख यांनी प्रत्येकी एक सुपर टॅकल करताना तेलगूवरील लोणचे संकट तीन वेळा टाळले. त्याच वेळी तेलगूने बंगळुरूवर दोन्ही डावांत एक लोण चढवून दबदबा राखला. मध्यंतरालाच तेलगूने १८-१० अशी आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला. सुकेश हेगडेच्या खोलवर चढाया आणि मिराजचा अष्टपैलू खेळ तेलगूच्या विजयात निर्णायक ठरला.

Web Title: Puneites gave the hosts a push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.